‘वंदे भारत’ रेल्वेला सोलापुरात थांबा द्यावा, सुभाष देशमुख यांची रेल्वेमंत्री दानवेंकडे मागणी

सोलापूर : देशातील सेमी हायस्पीड चालणारी गाडी म्हणून वंदे भारत एक्स्प्रेस प्रसिद्ध आहे. जलद प्रवास करणाऱ्या या रेल्वेचा लाभ सोलापूरच्या विकासात व्हावा. वंदे भारत सेमी हायस्पीड रेल्वेला सोलापुरात थांबा द्यावा, अशी मागणी आ. सुभाष देशमुख यांनी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.

देशमुख यांनी दिल्ली येथे ना. दानवे यांची भेट घेतली आणि सोलापूर जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध कामाविषयी निवेदन दिले. सोलापूरकरांचा मुंबई आणि पुण्याचा संपर्क अधिक आहे. त्यामुळे वंदे भारत हायस्पीड रेल्वे सेवा सुरु होत आहे. ताशी 140 कि.मी वेगाने धावणाऱ्या या रेल्वेमुळे सोलापूरच्या विकासात भर पडणार आहे.

या रेल्वेला सोलापूरला थांबा द्यावा, सोलापूर ते टिकेकरवाडी या लोहमार्ग दरम्यान आसर चौक येथील रेल्वे ओव्हरब्रिजचे रुंदीकरण व नूतनीकरण करावे, होटगी स्टेशन स्थानकावरील ब्रिटीशकालीन पूल वाहतूकीस खुला करावा, ग्रामीण भागातील लोकांना आरक्षण तिकिट काढण्यासाठी शहरात यावे लागते. त्यांची सोय करण्यासाठी होटगी स्टेशन स्थानकावर तिकीट आरक्षण कार्यालय चालू सुरू करावे, सोलापूर रेल्वे स्थानक येथे सौर ऊर्जा प्रकल्प बसवावा, होटगी स्टेशन येथे रेल्वेच्या खुल्या जागेत बांबू लागवड करण्यासाठी परवानगी मिळावी, पाकणी (ता. उत्तर सोलापूर) येथील 438/4/5 दरम्यान रेल्वे पूल खालून भुयारी मार्ग करून मिळावा यासह विविध मागण्या आ. देशमुख यांनी दानवे यांच्याकडे केल्या.

यावेळी दानवे यांनी वरील सर्व मागण्यांबाबत विचार केला जाईल आणि वंदे भारत रेल्वेला सोलापूरला थांबा देण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन दिले

हे वाचलंत का ?