दिल्ली विधानसभेतील यश हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर दिल्लीकरांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतिक – Ajit Pawar

दिल्ली विधानसभेतील यश हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर दिल्लीकरांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतिक - पवार

Ajit Pawar | दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’चा प्रमुख घटकपक्ष असलेल्या भाजपला मिळालेल्या ४० हून अधिक जागा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दिल्लीकरांनी व्यक्त केलेल्या विश्वासाच्या प्रतिक आहेत. केंद्र आणि दिल्ली विधानसभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे डबल इंजिन सरकार आल्याने दिल्लीच्या सर्वांगीण विकासाला दुप्पट गती मिळेल. चांगले रस्ते, स्वच्छ पाणी, उत्तम शिक्षण, दर्जेदार आरोग्य सुविधांचे, देशाच्या राजधानीचे सर्वांगसुंदर शहर हे दिल्लीकरांचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्ली विधानसभेतील निर्णायक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले असून दिल्लीत स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

दिल्लीतील भाजपच्या यशामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कष्ट व निवडणूक व्यवस्थापनाचेही मोठे योगदान आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेव आणि त्यांच्या टीमने घेतलेली मेहनतही महत्वाची ठरली. आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदीया यांच्यासारख्या नेत्यांना पराभूत करून दिल्लीकरांनी भाजप आणि ‘एनडीए’च्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे असेही अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्ली विधानसभेत अपेक्षित यश मिळाले नसले तरी या निवडणुकीतून आम्हाला खुप शिकायला मिळाले आहे. ही सुरुवात आहे. मिळालेल्या अपयशाचे विश्लेषण करुन भविष्यात देशपातळीवर पक्षबांधणीसाठी अधिक मेहनत घेतली जाईल. दिल्लीसह इतर देशातल्या अन्य राज्यात पक्षाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल, असा निर्धारही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

रूपाली चाकणकरांचं नाव येताच करुणा शर्मांचा गौप्यस्फोट; म्हणाल्या, “त्यांचं काम फक्त नेत्यांना..”

महायुती सरकारचा कृषी विभाग भ्रष्टाचाराचे कुरण, बॅटरी स्प्रेअर खरेदीत २३ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार | Nana Patole

पराभव स्वीकारण्याची मानसिकता नाही, म्हणून राहुल गांधींची रडारड सुरू – Chandrashekhar Bawankule

Previous Post
बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

Next Post
BJP's Victory reflection of Delhiites’ trust in Narendra Modi’s leadership - Ajit Pawar

BJP’s Victory reflection of Delhiites’ trust in Narendra Modi’s leadership – Ajit Pawar

Related Posts
Reliance_Jio

रिलायन्स जिओ स्वस्त रिचार्ज, 75 रुपयांपासून सुरू, एक वर्षासाठी वैधता, अमर्यादित कॉल आणि डेटा

नवी दिल्ली – देशात डिजिटल क्रांती पुढे नेण्यासाठी रिलायन्स जिओने (Reliance Jio) स्वस्त रिचार्ज योजना, स्वस्त डेटा पॅक…
Read More
akhilesh yadav

‘समाजवादी पक्षाच्या राजवटीत ब्राह्मण समाजावर जेवढे अत्याचार झाले, तेवढे आजपर्यंत कधीही झालेले नाहीत’

लखनौ – उत्तर प्रदेश सरकारचे कायदा मंत्री ब्रजेश पाठक यांनी राज्यातील भारतीय जनता पक्षावर ब्राह्मणांची नाराजी असल्याचा आरोप…
Read More
गांधी कुटुंबाने देशासाठी त्याग केला, भाजपने देशासाठी काय केले ? नाना पटोले यांचा थेट सवाल 

गांधी कुटुंबाने देशासाठी त्याग केला, भाजपने देशासाठी काय केले ? नाना पटोले यांचा थेट सवाल 

मुंबई – अमरावती दंगलीत भाजपाचे आमदार व नेतेच सक्रीय होते, भाजपाच्या नेत्यांनीच चिथावणी देणारी विधाने केली. त्यामुळे विरोधी…
Read More