नाना फक्त बोलले पण राष्ट्रवादीने बडा नेता गळाला लावत थेट कॉंग्रेसचा गेमच केला…

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर निकाळजे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमेव दुकान बंद होईल असं नुकतंच म्हटलं होतं. पंढरपूरची जागा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील दुकान बंद होत असेल तर बुलडाण्यातील एकमेव दुकान बंद व्हायला वेळ लागणार नाही, असं नाना पटोले म्हणाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने थेट कॉंग्रेसच्या बड्या नेत्याला प्रवेश दिल्याने नाना बोलले मात्र राष्ट्रवादीने कॉंग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केलाय.

सुधाकर निकाळजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशाने जालना जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सकारात्मक फरक पडेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरी भागात आपला प्रभाव वाढवण्याच्यादृष्टीने पावले उचलली आहेत. उल्हासनगर, भिवंडी यासारखी शहरे राष्ट्रवादीमय करण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. अशीच जालना जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर टाकत आहोत, असे जयंत पाटील यांनी नवीन सदस्यांना सांगितले.

आपला पक्ष हा शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचा पक्ष आहे. या विचारांना धरूनच आपण सर्वांनी एकत्र मिळून जालना जिल्ह्यात अधिक जोमाने काम करुया, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले. आगामी निवडणुकीत आपण जालना जिल्ह्यात केलेल्या समाजकार्याचा पक्षाला नक्कीच फायदा होईल असा विश्वास व्यक्त करत राजेश टोपे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी सुधाकर निकाळजे यांच्यासह विजय बनकर, नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते राजू दळे, भिमशक्तीचे रोहिदास गंगातिवारे, संतोष उन्हाळे, कैलास बनसोडे, भिमसेना पँथर पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेखर अख्तर, भिमशक्तीच्या जिल्हाध्यक्षा विशाखा सिरसाळ, धामगांवचे सरपंच अनिल साळवे, चिनेगाव ग्रामपंचायत सदस्य शिवाजी तायडे, कामगार नेते दिपक दांडगे, आरपीआयचे विजेंद्र दवंडे, उद्योगपती श्याम शिरसाट

तसेच बसपाचे शरद पवार, बसपा घनसावंगी विधानसभा सदस्य शेख बशीर शेख शमशोद्यीन, बसपा सेलगावचे ग्रामपंचायत सदस्य निलेश सोनावणे, समाजवादीचे ॲड. शेख वसीम शेख नबी-सिपोराकर, कांतीलाल हिवाळे, बाबासाहेब खरात, निलेश काकडे, कैलास गवई, निलेश डोलारे, रवी गायकवाड, अमोल तुपे, चंद्रकांत सोनावणे, ॲड. विनोद डिगे -जाफ्राबाद, संदिप गाडगे, शिवाजी चौहान, मांडवा ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल मोरे, अभिषेक डिगे, बाळकृष्ण हिवाळे, सुनीता गायकवाड, रंजना राजेगावकर, शारदा गवई आदींनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण तसेच पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील पहा