एकवीरेची शपथ कुणी खोटी ठरवली? सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : एकनाथ शिंदे आणि भाजपने (Eknath Shinde and BJP) एकत्र येत स्थापन केलेल्या सरकारने सोमवारी विधानसभेत बहुमताचा ठराव १६४ विरुद्ध ९९ अशा मतांच्या फरकाने जिंकला. यानंतर अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विरोधकांना चांगलेच धुतले.

ते म्हणाले, काही लोक आता प्रभू रामाच्या मंदिरात जातात आणि ज्यांनी जनादेशाचा अपमान केला, हिंदुत्वाचा अपमान केला, काल्पनिक पात्र म्हणून जे रामाला म्हणायचे, त्यांच्या मांडीला मांडी लावून आता बसलेत. मला आठवतंय 16 मार्च 1995 रोजी भाजप-शिवसेनेचे आमदार निवडून आले. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी (Late. Balasaheb Thackeray) सांगितलं आम्हाला कार्ल्याच्या एकवीरा मंदिरात जायचंय. आम्ही सर्वजण एकवीरा मंदिरात गेलो. काय शपथ घेतली होती आम्ही? बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शपथ दिली की आयुष्यात आम्ही काँग्रेससोबत जाणार नाही. कुणी खोटी ठरवली ही शपथ”, असं सुधीर मुनगंटीवार विधानसभेत म्हणाले.