Suicide News | डिप्रेशनमुळे प्रसिद्ध अभिनेत्रीने उचलले टोकाचे पाऊल, पंख्याला लटकलेला आढळला मृतदेह

मुंबईतील ओशिवरा परिसरात मलाबिका दास नावाच्या अभिनेत्रीचा मृतदेह ( Suicide News) सापडला आहे. ती कतार एअरवेजची माजी एअर होस्टेस देखील होती. तिचा मृतदेह घरात वाईट अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलाबिकाने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide News) केली असून कोणालाही त्याची कल्पनाही नव्हती. त्यानंतर मृतदेहाचा वास इतर घरांपर्यंत पोहोचल्यानंतर लोकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत त्यांच्या घरी जाऊन मृतदेह बाहेर काढला.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडून मालविकाला बाहेर काढले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. अभिनेत्रीचे पूर्ण नाव नूर मलाबिका दास असल्याचे समजते. ओशिवरा पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्री दीर्घकाळापासून नैराश्याने त्रस्त होती आणि नैराश्यासाठी औषधही घेत होती. प्राथमिक तपासावर विश्वास ठेवला तर नैराश्य हे देखील त्यांच्या आत्महत्येचे कारण मानले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी एडीआरची नोंद केली आहे.

नूर मलाबिका दास ही मूळची आसामची. ती आधी एअर होस्टेस होती आणि नंतर तिने अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. या 37 वर्षीय अभिनेत्रीने अनेक हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. उल्लू ओटीटी चॅनलच्या चारसमसुख या लोकप्रिय शोमधून ती लोकप्रिय झाली. याशिवाय ती सिसकीयान, मसालेदार चटणी, हसल आणि देखी देखी यांचा भाग आहे. याशिवाय ती काजोलच्या ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. ती सोशल मीडियावरही सक्रिय होती आणि तिचे 1 लाख 60 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. आता अभिनेत्रीचे चाहतेही तिच्या निधनाच्या बातमीने दु:खी झाले आहेत आणि शोक व्यक्त करत आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

Modi’s Cabinet : महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; जाणून घ्या कुणाला मिळणार संधी?

Murlidhar Mohol : नगरसेवक, महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी!