महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी विकास चंद्र रस्तोगी आणि पत्नी राधिका रस्तोगी यांची मुलगी लिपी (२७ वर्ष) हिने मुंबई, महाराष्ट्र येथे आत्महत्या (Suicide News) केल्य़ाची धक्कादायक घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आयएस अधिकाऱ्याच्या मुलीने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने या घटनेची चर्चा होते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी सांगितले की, विकास चंद्र रस्तोगी आणि राधिका रस्तोगी यांची मुलगी लिपी हिने पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास नरिमन पॉइंट येथील सरकारी निवासस्थानाच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारली. त्यानंतर तिला तातडीने जीटी रुग्णालयात नेण्यात आले, तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांनी सांगितले की, ती सोनीपत हरियाणात एलएलबीचे शिक्षण घेत होती आणि तिच्या अभ्यासातील कामगिरीबद्दल तिला काळजी वाटत होती. लिपीने आत्महत्येचे पाऊल उचलण्यापूर्वी सुसाईड नोट (Suicide News) लिहली आहे. तिच्या मृत्यूसाठी तिने कोणावरही आरोप केलेला नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी कफ परेड पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप