लेकी लग्नाला आलेल्या वयात ‘या’ अभिनेत्रीचे वडील दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर

‘इमली’ फेम टीव्ही अभिनेत्री सुंबूल तौकीर खानने (Sumbul Toqueer Khan) बिग बॉस 16 च्या घरात प्रवेश केल्यापासून ती चर्चेत आहे. पुन्हा एकदा सुंबुलचे नाव चर्चेत आले आहे. यावेळी ती तिच्या वडिलांमुळे (Sumbul Toqueer Father) चर्चेत आहे. सुंबुलचे वडील तौकीर हसन खान लवकरच दुसरे लग्न करणार आहेत. याबाबत सुंबूलही खूप खूश आहे. सुंबूलच्या कुटुंबियांनी लग्नाची तयारी (Sumbul Toqueer Father Second Wedding) सुरू केली आहे.

बिग बॉसच्या घरात सुंबूलने तिच्या वडिलांसोबतच्या नात्याबद्दल अनेकदा उघडपणे सांगितले आहे. आपल्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल आनंद व्यक्त करताना सुंबूल म्हणाली, “आम्ही त्यांचे आमच्या कुटुंबात स्वागत करताना खूप आनंदी आणि उत्सुक आहोत.”

सुंबूल पुढे म्हणाले की, माझे वडील गेल्या अनेक वर्षांपासून आमचे सर्वात मोठे प्रेरणास्रोत आहेत. आमचे बडे पापा इक्बाल हुसैन खान (कौटुंबिक आठवड्यात बिग बॉस 16 मध्ये दिसले होते) यांनी या लग्नात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मी त्यांची ऋणी आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुंबुल आणि तिच्या बहिणीने त्यांच्या वडिलांना दुसऱ्या लग्नासाठी राजी केले आहे. सुंबुलच्या म्हणण्यानुसार, ती खूप आनंदी आहे आणि तिच्या नवीन आईचे तिच्या कुटुंबात स्वागत करण्यास उत्सुक आहे. सुंबुलचे वडील निलोफरसोबत लग्नगाठ बांधणार आहेत. निलोफरचे यापूर्वी लग्न झाले आहे, ती तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे. निलोफरला इजरा नावाची मुलगी देखील आहे.