मुंबई | इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पण्या केल्याप्रकरणी पॉडकास्टर रणवीर इलाहाबादियाला ( Ranveer Allahabadia) दुसऱ्यांदा समन्स बजावले असतानाही तो अद्याप चौकशीसाठी हजर झालेला नाही.
मुंबईतील खार पोलिसांनी त्याला १३ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावले होते, मात्र तो हजर झाला नाही. त्याच्या टीमने सांगितले होते की तो १४ फेब्रुवारीला येईल, पण त्यावेळीही तो पोलिस ठाण्यात पोहोचला नाही.
यानंतर खार पोलीस आणि आसाम पोलिसांचे पथक त्याच्या वर्सोवा येथील घरी पोहोचले असता, त्याचे घर कुलूपबंद आढळले. पोलिसांनी त्याच्या घराबाहेर नोटीस चिकटवत त्याला तातडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात रणवीर इलाहाबादिया ( Ranveer Allahabadia), यूट्यूबर आशिष चंचलानी, इन्फ्लुएंसर अपूर्व मखीजा आणि शोचे निर्माता समय रैना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई आणि आसाम पोलिसांनी यावर स्वतंत्र तपास सुरू केला आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या | Atul Londhe
मुलींच्या फी माफीसाठी चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर, १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार