शरद पवारांना भीमा कोरेगाव प्रकरणी समन्स

 पुणे – शरद पवारांना (Sharad Pawar) भीमा कोरेगाव आयोगापुढे (Bhima Koregaon Commission) चौकशीकरता हजर राहण्यासाठी पुन्हा एकदा समन्स जारी (Summons issued) झालं आहे.   5 आणि 6 मे रोजी मुंबईत होणाऱ्या सुनावणीत हजर राहण्यासाठी आयोगानं पवारांना बजावलेलं हे तिसरं समन्स आहे.

1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात दंगल (Riot) उसळली होती. पुणे जिह्यात घडलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयकडे (NI) सोपवला असला तरी राज्य सरकरातर्फे चौकशी आयोगाचं कामकाज सुरूच आहे.

‘भीमा कोरेगाव प्रकरणी उसळलेल्या हिंसाचाराला मिलिंद एकबोटे(Milind Ekbote) आणि संभाजी भिडे (Sambhaji Bhide) जबाबदार असून त्यांनी तिथलं वातावरण बिघडवलं होतं. तसेच या प्रकरणी वस्तुस्थिती आणि पुणे पोलिसांचा तपास यात कमालीचा विरोधाभास आहे’, असं पवारांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं होत.
त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांची साक्षही चौकशी आयोगाने नोंदवली पाहिजे अशी त्यांची मागणी करणारा अर्ज विवेक विचार मंचचे सदस्य सागर शिंदे (Sagar Shinde) यांनी आयोगाकडे केला होता.