Sunetra Pawar: शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ असा उल्लेख केल्याने सुनेत्राताईंना अश्रू अनावर, म्हणाल्या….

शरद पवारांनी 'बाहेरचे पवार' असा उल्लेख केल्याने सुनेत्राताईंना अश्रू अनावर, म्हणाल्या....

Sunetra Pawar: बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये (Baramati Loksabha Election) पवार कुटुंबात असलेला संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीकर कायम पवार कुटुंबाला साथ देतात, आजवर त्यांनी साहेबांना नंतर मुलीला विजयी केल आहे, आता सुनेला विजयी करा, असे विधान केलं होत. अजितदादांच्या या विधानावर बोलताना शरद पवार यांनी “बाहेरचे पवार आणि मूळचे पवार यांच्यामध्ये फरक आहे” म्हणत सुप्रिया सुळे (Supriya Sule) मूळ तर सुनेत्रा पवार या विवाह नंतर पवार झाल्याचा अप्रत्यक्षपणे सांगितलं होतं. काका पुतण्यांच्या या विधानावरूनच मोठा गदारोळ राजकीय क्षेत्रात उडाला आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार या माध्यमांशी बोलत असताना शरद पवारांच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारताच त्यांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं. मात्र यावेळी बोलताना त्यांनी “माझी उमेदवारी ही जनतेची मागणी होती, त्यामुळे जिथे जाते तिथे मोठा पाठिंबा मिळतो” असं सांगितलं आहे.

सुनेत्रा पवार नेमकं काय म्हणाल्या?
मतदारसंघातील लोकांमध्ये मोठा उत्साह असून जिथे जाईल तिथे लोक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या वाटेवर चालण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असेल तर योजना शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहचवला मदत होते. त्यामुळे दोन्हीकडे एकच सरकार असणे गरजेचे आहे. बारामती मतदारसंघांमध्ये जो विकास झाला आहे, तशाच प्रकारचा विकास इतर तालुक्यांमध्ये देखील घडवायचा आहे. बारामतीमध्ये अनेक कंपन्या आहेत, महिलांना रोजगार मिळाला आहे. तसाच विकास मतदारसंघातील इतर ठिकाणी करण्याचा माझा मानस आहे. माझी उमेदवारी ही जनतेची मागणी होती त्यामुळे जिथे जाते तिथे मोठा पाठिंबा मिळतो आहे, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Dinesh Karthik | दिनेश कार्तिकच्या फॉर्ममुळे विकेटकीपर्सचा तणाव वाढला! या ३ खेळाडूंवर टांगती तलवार

विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवाजी आढळराव पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही-अपूर्व आढळराव पाटील

उपमुख्यमंत्री पवार यांची पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांसोबत आढावा बैठक; नीलम गोऱ्हे यांचा सहभाग

Previous Post
Vanchit Bahujan Aghadi | वंचितला बी टीम म्हणणाऱ्या गांधींना वंचितने सुनावले; विचारले, 'स्वतःला B अक्षरापुरते मर्यादित का करता?'

Vanchit Bahujan Aghadi | वंचितला बी टीम म्हणणाऱ्या गांधींना वंचितने सुनावले; विचारले, ‘स्वतःला B अक्षरापुरते मर्यादित का करता?’

Next Post
Murlidhar Mohol | यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी

Murlidhar Mohol | यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी

Related Posts
Jayant Patil | हातात संविधान अन् मनात विजयाचा विश्वास; जयंत पाटील यांचे जोरदार भाषण

Jayant Patil | हातात संविधान अन् मनात विजयाचा विश्वास; जयंत पाटील यांचे जोरदार भाषण

Jayant Patil | राज्याचे पावसाळी अधिवेशनाची आणि महायुती सरकारच्या शेवटच्या अधिवेशनात सांगता आज झाली. शेवटच्या दिवशी आलेल्या अंतिम…
Read More
Vallabh Benke | शरद पवार यांचे खंद्दे समर्थक माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे निधन

Vallabh Benke | शरद पवार यांचे खंद्दे समर्थक माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे निधन

Vallabh Benke Passes Away : शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व कृष्णा खोरे…
Read More

मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपाची ८० कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याची योजना

मुंबई – मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे (BJP) देशभर महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून…
Read More