भारतीय ज्येष्ठ फुटबॉलपटू सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सुनीलने आपल्या 20 वर्षांची दीर्घ फुटबॉल कारकीर्द थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. सुनील आता फिफा विश्वचषक पात्रता सामन्यात 6 जून रोजी कुवैत विरुद्ध शेवटचा सामना खेळताना दिसणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने एक्स वर पोस्ट करत सेवानिवृत्तीची घोषणा केली आहे. या व्हिडिओच्या मथळ्यामध्ये कॅप्टनने लिहिले की मला काहीतरी सांगायचे आहे…
सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने आपल्या एक्स अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करून सेवानिवृत्तीची घोषणा केली आहे. हा व्हिडिओ नऊ मिनिटापेक्षा जास्त अवधीचा असून ज्यामध्ये तो देश, चाहते आणि कुटुंबाचे आभार मानताना दिसला. सुनील म्हणाला की ज्या दिवशी मी माझ्या देशासाठी प्रथमच खेळलो, तो दिवस माझ्या आयुष्याचा एक खास दिवस होता. जे मी कधीही विसरू शकत नाही.
I'd like to say something… pic.twitter.com/xwXbDi95WV
— Sunil Chhetri (@chetrisunil11) May 16, 2024
6 जून रोजी त्याचा शेवटचा सामना खेळेल
त्याच्या शेवटच्या सामन्याबद्दल सुनील म्हणाला की, गेल्या 19 वर्षांत मी देशासाठी बरेच सामने खेळलो. यावेळी, मी माझे कर्तव्य चोखपणे पार पाडले आणि मला चाहत्यांकडून खूप प्रेम देखील मिळाले. शेवटचे दीड, दोन महिने मी याबद्दल विचार करीत होतो. आता कुवैत विरुद्ध माझा शेवटचा सामना होणार आहे. सुनील छेत्री याने भारतासाठी 145 सामने खेळले आहेत.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप