लग्न राहुल आणि अथियाचे, पण चर्चा सुनिल शेट्टींच्या प्रेमकहाणीची! मुस्लीम मुलीसोबत थाटला होता संसार

नुकताच भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (KL Rahul Athiya Shetty Wedding) यांचा विवाहसोहळा पार पडला. अथियाचे वडील सुनिल शेट्टी (Sunil Shetty) यांच्या खंडाळ्यातील फार्महाउसवर १०० पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांनी सातफेरे घेतले. गेली काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर त्यांनी आयुष्यभरासाठी एकमेकांचे होण्याचा निर्णय घेतला.

परंतु राहुल आणि अथियाच्या लग्नानंतर प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते सुनिल शेट्टी यांच्या प्रेमकहाणीच्या भरपूर चर्चा रंगू लागल्या आहेत. आता सुनिल शेट्टींच्या लवस्टोरीची (Sunil Shetty LoveStory) चर्चा रंगू लागली आहेच, तर मग जाणून घेऊया कशी राहिलीय त्यांची प्रेमकहाणी?

सुनिल शेट्टींची प्रेमकहाणी पेस्ट्रीच्या दुकानात सुरू झाली. एका पेस्ट्रीच्या दुकानात सुनिल शेट्टींनी माना यांना पहिल्यांदा पाहिले आणि पहिल्या नजरेतच त्यांना माना आवडल्या. त्यावेळी फोनचे युग नव्हते. त्यामुळे सुनिल शेट्टी यांनी माना यांच्या बहिणीशी मैत्री केली. यानंतर बहिणीने दोघांची ओळख करुन दिली आणि त्यांची प्रेमकहाणी (Sunil Shetty Mana shetty Lovestory) सुरू झाली.

माना शेट्टींचा जन्म गुजराती-मुस्लिम कुटुंबात झाला. माना यांच्या वडिलांचे नाव इफ्तिखार एम. कादरी होते, ते व्यवसायाने आर्किटेक्ट होते. याचा अर्थ असा होतो की, माना या अर्ध्या गुजराती मुस्लिम कुटुंबातील आणि अर्ध्या पंजाबी हिंदू कुटुंबातील होत्या. म्हणून असे म्हटले जाते की, दोघांच्या कुटुंबीयांना भीती होती की धर्म वेगवेगळे असल्यामुळे त्यांचे लग्न जास्त वर्षे टिकू शकणार नाही आणि यामुळेच त्यांच्या कुटुंबियांना लग्नासाठी तयार करायला १-२ वर्षे नव्हे तर सुमारे ९ वर्षे लागली.

अखेर धर्माची भिंत ओलांडून सुनिल शेट्टी आणि माना यांनी १९९१ मध्ये लग्न केले. सुनील शेट्टी आणि माना शेट्टी यांना अथिया शेट्टी आणि अहान शेट्टी अशी दोन मुले आहेत.