Sunil Tatkare | लोकसभा निवडणूक यावेळी वेगळी परिमाण घेऊन आली होती. मात्र आता विधानसभा निवडणुकीला अजित पवार यांच्या कणखर नेतृत्वाखाली सामोरे जायचे आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी श्रीरामपूर येथील आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना केले.
या लोकसभा निवडणुकीत स्वर्गीय गोविंदराव आदिक यांच्यावर प्रेम करणारा अल्पसंख्याक समाजही त्यांच्या पाठीशी ठाम राहून त्यांनी महायुतीला साथ दिली. एका कुटुंबावर ४० वर्ष निष्ठा ठेवून पाठीशी राहणारी इथली जनता राज्यात पहिल्यांदा पहायला मिळाली आहे. हा मतदारसंघ राखीव झाल्याने हा परिणाम दिसला आहे मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ आपल्याकडे कसा राहिल यासाठी नक्कीच विचार केला जाईल असा शब्दही सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी यावेळी दिला.
लोकशाहीत आपल्या पाठीशी ताकद काय असते हे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने दाखवून दिले आहे. ४० वर्ष पक्षाच्या आणि अजितदादांच्या पाठीशी ठाम राहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत या जाणून घेण्यासाठी ही आढावा बैठक घेतल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएचा घटक पक्ष असल्याने अरुणाचलप्रदेशमध्ये काही आमदार निवडून आले आहेत त्यामुळे पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी इतर राज्यातही आता निवडणूक लढवणार असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.
राज्यात सर्वाधिक जागा घड्याळ चिन्हावर कशा आणता येईल असा प्रयत्न करणार आहोत असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
२४ तास राबणाऱ्या अजितदादाविषयी सहानुभूती निर्माण करण्यासाठी काम करुया आणि येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळवून देऊया असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.
राजकारणात जिवंतपणा कसा असावा हे त्या कालावधीत स्वर्गीय गोविंदराव आदिक यांच्याकडे बघून लक्षात यायचे अशी आठवणही सुनिल तटकरे यांनी यावेळी सांगितली.
आमदार आशुतोष काळे, राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर आदींनी आपले विचार मांडले.
सकाळी अहमदनगर शहर, ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर संध्याकाळच्या सत्रात श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ व नेवासा तालुक्याचा आढावा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी घेतला.
या आढावा बैठकीला प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, कोपरगाव आमदार आशुतोष काळे, राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, शिर्डी संस्थानच्या विश्वस्त अनुराधा आदिक,
श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष किशोर पाटील, महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, अहमदनगर ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब नहाटा, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष शिवाजी बनकर, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष कपिल पवार, आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :