Sunil Tatkare | संसदरत्न असलेल्या लोकांना पहिल्या रांगेत अजितदादा बसलेले होते हे बघवत नव्हते

Sunil Tatkare | महाराष्ट्रात नवीन अजितपर्व सुरु झाले असून हे विश्वासार्हतेचे पर्व आहे विश्वासघाताचे नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.सर्व घटकांना सर्व समाजाला सोबत घेत शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या वैचारिक अधिष्ठानापासून तसुभरही बाजुला न होता यापुढची गौरवशाली वाटचाल करणार असल्याचे सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी स्पष्ट केले.

‘एकच लक्ष्य, विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेऊन आपल्याला काम करायचे आहे. आपला स्ट्राईक रेट किती आहे हे अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला दाखवायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत हे चित्रही आपल्याला प्रस्थापित करायचे असून जिद्दीने कामाला लागा असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचे आम्हीच वारसदार आहोत असा धिंडोरा पिटणारे सोशल मिडियावर ज्या पद्धतीने व्यक्त होत होते हे चिंताजनक होते असा टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला. पराजयाने नाउमेद होऊ नका. जनतेसाठी २४ तास काम करणारा नेता आपल्या पाठीशी उभा आहे हे लक्षात ठेवा असे सांगतानाच संसदरत्न असलेल्या लोकांना पहिल्या रांगेत अजितदादा बसलेले होते हे बघवत नव्हते त्यामुळे त्यांची पोटदुखी वाढलेली दिसली अशी खोचक टिकाही सुनिल तटकरे यांनी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप