महाराष्ट्राच्या राजकारणात कुणाचा गेम होणार? सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष 

मुंबई – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा फैसला उद्या होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी आज एका प्रकरणाची सुनावणी करत असतानाच  उद्या दोन महत्वाच्या प्रकरणांवर घटनापीठ निकाल देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि सोळा आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय आल्यास विद्यमान सरकार कोसळू शकते असा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडून आम्ही सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली असल्याने कोणताही धोका नसल्याचे सांगितले जात आहे. आता हा निर्णय उद्या येणार असल्याची शक्यता असल्याने महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यासाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाकडून ज्या 16 आमदारांच्या अपात्रतेची मागणी करण्यात आली आहे, त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ काही निर्णय घेणार की हे प्रकरण विधानसभेत विधानसभा अध्यक्षांकडे (तत्कालिन की विद्यमान हा सुद्धा पेच आहे) पाठवलं जाणार याकडेही लक्ष आहे. अपात्रतेची तलवार डोक्यावर लटकत असलेले ते 16 आमदार कोण? यावर नजर टाकूया.

एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदिपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, संजय रायमुलकर, रमेश बोरणारे, चिमणराव पाटील, महेश शिंदे. (Eknath Shinde, Abdul Sattar, Tanaji Sawant, Yamini Jadhav, Sandipan Bhumre, Bharat Gogawle, Sanjay Shirsat, Lata Sonawane, Prakash Surve, Balaji Kinikar, Balaji Kalyankar, Anil Babar, Sanjay Raimulkar, Ramesh Borwane, Chimanrao Patil, Mahesh Shinde.)