उद्धव ठाकरे गटाची ‘ही’ मागणी नाकरत सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) प्रकरणाची आज महत्वाची सुनावणी पार पडली आहे. यात सात न्यायमूर्तींकडे हे प्रकरण देण्याची मागणी ठाकरे गटाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने नाकारली आहे. सत्ता संघर्षाचे हे प्रकरण पाच न्यायमूर्तींकडेच राहणार असून या प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे.

पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीपासून होणार आहे. महराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचे प्रकरण ज्या गतीने सुप्रीम कोर्टात सुरू आहे. त्यावरून एप्रिल किंवा मे महिन्यात या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील सुनावणी ही मेरिटवर सुरू राहणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाची मागणी फेटाळली, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आज निर्णय लागेल असं अपेक्षित होतं. आता न्यायालयाने सांगितलं आहे की, यावर निर्णय घेणं सोपं नाही. असं असलं तरी न्यायालयाला दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यावर निर्णय घ्यावाच लागेल. न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की, नबाम रेबिया निकाल डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेता येईल असं नाही.