मोहित कंबोज या फुगलेल्या फुग्याची हवा टाचणी मारून काढावीचं लागेल – चव्हाण

मुंबई :   भाजपाचे मोहित कंबोज (Mohit Komboj)हे नेहमी त्यांच्या ट्विटवरुन चर्चेत राहिलेले आहेत. यापूर्वीही सत्तांतरादरम्यानचे त्यांचे ट्विट चर्चेचा विषय ठरले होते. तर मध्यंतरी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर कारवाईबाबतचे ट्विट केले होते.  यापूर्वी त्यांनी काही नेत्यांच्या बाबतीत केलेले भाकीत खरे ठरले असून नवाब मलिक, अनिल देशमुख आणि संजय राऊत हे त्याचे उदाहरण आहेत.

दरम्यान, त्यांनी नुकतेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बाबत देखील एक ट्वीट केले होते. यानंतर त्यांनी आपल्या ट्विटद्वारे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा (Vidya Chavan) विद्या यांनाच थेट आव्हान देणारे ट्विट केले आहे. विद्याताई जय श्रीराम या त्यांच्या वक्तव्यावरुन आता (Politics) राजकीय वर्तुळात नेमके काय होणार याबाबत चर्चा रंगली आहे.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता राष्ट्रवादीने देखील जशास  तसे उत्तर देणार आहे. हे शिवधनुष्य आता राष्ट्रवादी युवकचे नेते सुरज चव्हाण उचलणार असून त्यांनी तशी घोषणाच केली आहे. ते म्हणाले, मोहित कंबोज हा सत्तेच्या हवेवर फुगलेला फुगा आहे.या फुगलेल्या फुग्याची हवा टाचणी मारून काढावीचं लागेल.आणि ती लवकरच मीच काढतो. मेरा भी Case Study जारी हैं ! असं त्यांनी प्रतिआव्हान कंबोज यांना दिले आहे.