मोदी यांच्यापेक्षा शरद पवार चांगले पंतप्रधान होतील हे नक्की – निखील वागळे

मुंबई –  पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत पंजाब वगळता इतर सर्व राज्यात भाजपचा जलवा पाहायला मिळाला आहे. यामुळे विरोधक धास्तावले असून विरोधकांची एकी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भूमिका निर्णायक बजावू शकतात अशी काहींना आशा आहे. यातूनच आता शरद पवारांनी (Sharad Pawar)संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) अध्यक्षपद घ्यावं यासाठी प्रस्ताव संमत करण्यात आला आहे.

दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार देखील उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. त्यामुळे एकीकडे काँग्रेसच्या नेतृत्वावरून वादंग सुरु असतानाच दुसरीकडे शरद पवारांकडे युपीएच्या नेतृत्वावरुनही घमासान होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आता याच मुद्यावरून आता पत्रकार निखील वागळे यांनी केलेले एक ट्वीट चांगलेच चर्चेत आले आहे. ते म्हणाले, शरद पवार युपीएचे अध्यक्ष कशाला, थेट पंतप्रधान झालेलेही महाराष्ट्राला चालतील. मोदी यांच्यापेक्षा ते चांगले पंतप्रधान होतील हे नक्की. नाहीतरी राहुल बजाज म्हणाले होते,पवार हे (आजवर कधीही न झालेले) देशाचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान आहेत! असं वागळे यांनी म्हटले आहे.