Ajit Pawar | बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.यापूर्वी मनोज जरांगे, अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनीच संशयित आरोपी वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांच्या संबंधांवर प्रश्न उपस्थित केले होते.मात्र, आता हाच मुद्दा लावून धरणारे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी पत्रकारांनाच सुनावलं.
धस आणि मुंडे यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालाच अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुनावलं आहे. ‘तुला काय वाईट वाटतं. एक मंत्री आहेत एक आमदार आहेत. यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला आहे, समजलं. दादा आणि मी एकमेकांच्या विरोधात होतो. पण आम्ही भेटायचो बोलायचो. आमची काय दुष्मनी नाहीये, आमची त्यावेळी विचारधारा वेगळी होती. आज आमची विचारधारा जुळलेली आहे. त्यापद्धतीनं आम्ही पुढे चाललो आहेत. त्याच्यामुळे त्यांचे पूर्वीपासूनच संबंध आहेत. समजा तुम्ही जर आजारी पडलात आणि जर तुमचे एखाद्या व्यक्तीसोबत जमत नसेल, पण तो तुमची विचारपासून करण्यासाठी आला तर त्यात काही चुकीचं आहे का? असा सवाल अजित पवार यांनी यावेळी केला.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
२०१९ पूर्वीच्या गाड्यांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक; ३१ मार्चची अंतिम मुदत
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ, ‘शीशमहल’ प्रकरणी CVC चे चौकशीचे आदेश