Manoj Jarange | बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
यापूर्वी मनोज जरांगे, अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनीच संशयित आरोपी वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांच्या संबंधांवर प्रश्न उपस्थित केले होते.मात्र, आता हाच मुद्दा लावून धरणारे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, आता धस-मुंडे भेटीनंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) आक्रमक झाले आहेत. “सुरेश धस यांनी मोठा धोका दिला. देवेंद्र फडणवीसांनीही असा धोका दिला नाही,” अशी टीका त्यांनी केली. “गुंडांची टोळी चालवणाऱ्यांची भेट घेणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे,” असेही ते म्हणाले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या | Atul Londhe
मुलींच्या फी माफीसाठी चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर, १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार