“मी रैना आहे शाहीद आफ्रिदी नाही…”, सुरेश रैनाने पाकिस्तानी खेळाडूची उडवली खिल्ली, व्हिडिओ व्हायरल

माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) लिजेंड्स लीग क्रिकेटचा भाग असून चांगल्या लयमध्ये खेळत आहे. तो इंडिया महाराजाकडून खेळताना दमदार प्रदर्शन करत आहे. चांगल्या लयीत असलेल्या रैनाला जेव्हा निवृत्तीवरून माघार घेण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने गंमतीने सांगितले की तो शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) नाही. रैनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इंडिया महाराजाच्या सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने रैनाला विचारले, “आज रात्री लीजेंड्स लीग क्रिकेटमधील (Legends League Cricket) तुझ्या कामगिरीनंतर प्रत्येकाला तू आयपीएलमध्ये परतावे असे वाटत आहे.” यावर रैना म्हणाला, “मी सुरेश रैना आहे. मी शाहिद आफ्रिदी नाही. मी निवृत्ती घेतली आहे.”

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी स्टार शाहीद आफ्रिदीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अनेक वेळा पुनरागमन केले आहे. यासाठी सुरेश रैनाने पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर देताना शाहीदच्या नावाचा उल्लेख केला.