सुशांतची आत्महत्या नाही, तर हत्याच; पहा कुणी केलाय हा दावा 

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput Last Instagram Post) वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या केली. सुशांतने वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्यापही (Sushant Singh Rajput Instagram Post) अस्पष्ट आहे. पण आता कूपर रुग्णालयात कर्मचारी रुपकुमार शाह यांनी सुशांतची आत्महत्या नाही, तर हत्याच झाल्याचं स्पष्ट केलं आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या नाही तर हत्या करण्यात आल्याचा दावा कुपर हॉस्पिटलमधील कर्मचार्‍याने केला आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘सुशांतच्या पोस्टमार्टमवेळी रुपकुमार शाह हा कर्मचारी तिथे होता. त्यानं दावा केला आहे की, जेव्हा सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला तेव्हा त्याचं पोस्टमार्टम करण्यासाठी त्याला कूपर रुग्णालयात आणण्यात आलं. त्या वेळेस कूपरमध्ये 5 बॉडी पोस्टमार्टमसाठी आणण्यात आल्या होत्या. त्यातील एक VIP डेड बॉडी होती.

आम्ही पोस्टमार्टमसाठी गेलो तेव्हा आम्हाला कळलं की, बॉडी सुशांत सिंह राजपूतची होती. त्यांच्या शरिरावर अनेक खुणा होत्या. मानेवरही 2-3 ठिकाणी जखमांच्या खुणा होत्या. पोस्टमार्टमचं रेकॉर्डिंग करायला हवी होती. पण उच्च अधिकाऱ्यांकडून आम्हाला केवळ बॉडीचे फोटो काढायला सांगितले.आम्ही तेव्हा जे काही केलं ते त्यांच्या आदेशानुसार केलं.

रुपकुमार यांनी पुढे सांगितलं की, ‘आम्ही जेव्हा सुशांतची डेड बॉडी पाहिली तेव्हा आमच्या सिनीअर्सना लगेच सांगितलं की, ही आत्महत्या नसून ही हत्या आहे. आपल्याला नियमांनुसार करावं लागेल, असंही मी सांगितलं.  पण माझ्या सिनीअर्सनी मला बॉडीचे फोटो काढून लवकरात लवकर बॉडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात सांगितलं. त्यामुळेच आम्ही सुशांतचं पोस्टमार्टम रात्री केलं होतं.असं त्याने सांगितले.