पैसे घेऊन पद वाटत असल्याने सुषमा अंधारेंना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाची मारहाण ?

बीड: हिंदू देवी-देवता आणि संतांचा अपमान केल्याने मागे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare )चर्चेत आल्या होत्या. आता त्याच सुषमा अंधारे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मात्र यावेळी चर्चेत येण्याचे कारण जरा वेगळे आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला आहे.

सुषमा अंधारे या पदांसाठी पैसे घेत असल्याचा आरोप बीडचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. त्यातून त्यांनी अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा केला. दरम्यान, शिवसेने ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यात धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. त्यानंतर हे सर्व प्रकरण घडल्याचं समोर आलं आहे.

सुषमा अंधारे या कार्यकर्त्याकडून ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळत असल्याचा गंभीर आरोप बीडचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला. तर महाप्रबोधन यात्रेच्या पार्श्वभूमीवर, या यात्रेला गालबोट लागावं म्हणून शिंदे गटाने ही स्क्रिप्ट रचल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.