तुम्ही फक्त भावकीत भांडण करू शकता, सुषमा अंधारे यांची राज ठाकरेंवर टीका

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी मुंबईत सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी राज्यातील विविध मुद्द्यांवर चौफेर टीका केली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती यिका केली.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज ठाकरे म्हणलाे की, कालपरवापर्यंत मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले तब्येतीचं कारण सांगून घरात बसले. एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री कांडी फिरवली अन् आता हे सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणारा मी नाही.

स्वत:च्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घेणारा मी नाही. मी यांच्यासारखा नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का? कधी भूमिका घेतलीच नाही. पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, मला सत्तेत बसवा अशी भूमिका घेतली. फक्त पैशासाठी आणि सत्तेसाठी याच्यासोबत त्याच्यासोबत गेले. असं राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, या टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, या सगळ्यांवर बोलण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्राचं काय नवनिर्माण करणार आहात, हे पाहिलं पाहिजे. छत्रपती शिवरायांचा अवमान करणारे वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांबद्दल तुम्ही ठामपणे वक्तव्य करू शकत नाहीत, ज्या देवेंद्रजींनी मनसे म्हणजे मतदार नसलेला सेना… अशी टीका केली, त्यांना तुम्ही उत्तर देऊ शकत नाहीत. तुम्ही फक्त भावकीत भांडण करू शकता, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.