प्रसिद्धीसाठी हपापलेल्या सुषमा अंधारे यांनी ओकली संतांच्या विरोधात गरळ; वारकरी संघटना आक्रमक 

पुणे- प्रसिद्धीसाठी हपापलेल्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे त्यांच्या वाचाळपणासाठी ओळखल्या जातात. यापूर्वी त्यांनी अनेक हिंदू देवीदेवतांची यथेच्छ बदनामी केली आहे. आता त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले असून आता त्यांनी मोर्चा अखिल विश्वाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायाकडे वळवला आहे.

वारकरी संप्रदायातील महान संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर तसेच महाबली हनुमान यांच्याबाबत अक्षरशः गरळ ओकली आहे. त्यांच्या भाषणामधील काही वक्तव्यामुळे वारकरी सांप्रदायाचे भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे सुषमा अंधारेंवर वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे.

आळंदी येथील वारकऱ्यांनी सुषमा अंधारेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत त्यांना चपलेचा हार घालत निषेध केला. आळंदीचे युवा कीर्तनकार महेश अप्पा मडके पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. सुषमा अंधारेंच्या प्रतिमेस चपलांचा हार घालत वारकऱ्यांकडून त्यांच्याच शैलीत उत्तर देण्यात आलं. संतांबाबत बोलण्याआधी अभ्यास करा असा सल्लाही वारकऱ्यांनी सुषमा अंधारेंना दिला आहे.