हिंदू देवी-देवतांची खिल्ली उडवण्यात आघाडीवर असणाऱ्या सुषमा अंधारे यांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन 

मुंबई – कोल्हापुरात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काल अंबाबाईचं दर्शन घेतलं. शिवसेनेत येण्यापूर्वी हिंदू (Hindu) देवी-देवतांविरोधात कठोर भूमिका घेणाऱ्या सुषमा अंधारे यांची यानिमित्ताने दुटप्पी भूमिका समोर आली आहे. ठाकरे गटात दाखल होण्यापूर्वी हिंदू देवी-देवतांची खिल्ली उडवण्यात आघाडीवर असणाऱ्या सुषमा अंधारे या आता चक्क देवदर्शनाला जात आहेत.

याच दुटप्पी भूमिकेवरून आता त्यांना लक्ष्य केले जात आहे.  सार्वजनिक ठिकाणी थेट मोठ-मोठे बॅनर्स लावूनच सुषमा अंधारे यांच्या भूमिकांवरून उद्धव ठाकरे यांना सवाल केला जातोय. चेंबूरमध्ये सुषमा अंधारेंविरोधातले बॅनर्स सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत.

आई तुळजाभवानीची खिल्ली उडवणाऱ्या याच त्या सुषमा अंधारे, हेच का तुमचं हिंदुत्व? असा सवाल ठाकरे गटाला करण्यात आला आहे. मराठा युवा सेनेने हे बॅनर्स लावले आहेत. दरम्यान, केवळ शिंदे गटावर टीका करणे हा अजेंडा असणाऱ्या अंधारे यांचे खरे रूप यानिमित्ताने समोर आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.