लाखो चाहते ज्या बातमीची वाट पाहत होते ती बातमी अखेर आलीच; स्वरा भास्कर होणार आई

Swara Bhasker Pregnancy: बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करने तीन महिन्यांपूर्वी समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत लग्न केले होते. तेव्हापासून चाहते अभिनेत्रीच्या गुड न्यूजची वाट पाहत होते. अखेर स्वराने घोषणा केली आहे की ती आई होणार आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या गरोदरपणाची घोषणा केली आहे. दुसरीकडे, स्वराने ही आनंदाची बातमी शेअर करताच, चाहत्यांनी तिचे जोरदार अभिनंदन केले आहे.

स्वराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एका फोटोसह तिच्या गरोदरपणाची घोषणा केली आहे. फोटोमध्ये स्वरा पती फहादसोबत दिसत आहे. तिने गुलाबी रंगाचा पोशाख घातला आहे ज्यामध्ये तिचा बेबी बंप देखील स्पष्ट दिसत आहे.तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा करताच सर्व सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चाहते त्याचे अभिनंदन करताना थकत नाहीत.