राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ आव्हाड यांची गाडी फोडण्यात आली होती. या प्रकरणी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव व उपाध्यक्ष अंकुश कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज या दोघांना देखील न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
जमीन मिळाल्या नंतर जाधव म्हणाले कि आजवर राजकीय पक्षानी शिवराय शाहू महाराज राजकारणासाठी वापरले यापुढे संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाचे कारकर्ते शिवराय शाहू महाराज तसेच वंशजंचा अवमान सहन करणार नाही समोर कोणीही असू.
यावेळी उपाध्यक्ष अंकुश कदम म्हणाले की, आमच्या पक्षाचे प्रमुख तसेच शिव शाहूंचे वंशज संभाजीराजे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणे, हे महाराष्ट्रातील जनतेला आवडले नाही. राजकारणासाठी राजकीय ( Jitendra Awhad ) नेत्यांनी जबाबदारी ने वक्तव्य करावीत, धार्मिक जातीय तेढ वाढवू नये अशी अपेक्षा आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप