स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहे,त्यांचा अपमान सहन करणार नाही; ठाकरेंचा गांधींना इशारा

नाशिक – शिवसेना उद्धव बलासाहेव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा नुकतीच मालेगाव शहरात झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. सोबतच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावर देखील भाष्य करत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना झापलं आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दिला आहे. आपण देशातील लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. पण, सावरकर यांचा अपमान सहन करणार नसल्याचे उद्धव यांनी म्हटले.

भारत जोडो यात्रेत आम्ही राहुल गांधी यांच्यासोबत होतो ही लोकशाहीची लढाई असल्याने आम्ही आजही सोबत आहोत मात्र सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही लढाईचा असेल तर दैवतांचा अपमान सहन करणार नाही.आज आपण सर्वजण सोबत आहोत मात्र अशा पद्धतीने दैवतांचा अपमान सहन केला जाणार नाही वेळ चुकली तर हुकूमशाही कडे गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून एकत्र राहून व्यवस्थित काम करू असं ते म्हणाले.