अभिनेत्री स्वाती हनमघर ठरल्या ‘विआ मिस अँड मिसेस इंडिया 2021’ च्या फस्ट रनरअप आणि मिसेस फोटोजेनीक

Swati Hanamghar

पुणे : प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल स्वाती हनमघर यांनी नुकत्याच राजस्थान मधील जयपूर येथे संपन्न झालेल्या अग्रनामांकित अशा राष्ट्रीय पातळीवरील ‘विआ मिस अँड मिसेस इंडिया 2021’ या स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले आहे. ‘विआ मिस अँड मिसेस इंडिया 2021’ स्पर्धेच्या त्या फस्ट रनरअप  ठरल्या आहेत. तसेच या स्पर्धेत त्यांना मिसेस फोटोजेनीक हा किताब सुद्धा मिळाला आहे.

‘विआ मिस अँड मिसेस इंडिया 2021’ या  स्पर्धेचा यंदा 5 वा सीजन होता, यावर्षीची थीम ‘नारी तू नारायणी’ अशी होती. या स्पर्धेत देशभरातील स्पर्धक सहभागी झाल्या होत्या.  या स्पर्धेत वेस्टर्न, ट्रेडिशनल, इंडो वेस्टर्न व स्पार्कल डिजाइनर आउटफिट्स थीम असे तीन राऊंड ठेवण्यात आले होते. या तीन राउंड्स मधून सिलेक्ट झालेल्या टॉप फाइनलिस्ट मॉडेल्स  या टाइटल क्राउन साठी पात्र ठरल्या होत्या असे अभिनेत्री स्वाती हनमघर यांनी सांगितले.

‘विआ मिस अँड मिसेस इंडिया 2021’स्पर्धेतील यशाबद्दल बोलताना अभिनेत्री स्वाती हनमघर म्हणाल्या की, हरिष सोनी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत मिस आणि मिसेस अशा दोन्ही गटात स्पर्धक सहभागी होत्या त्यात क्लासिक आणि गोल्ड अशा कॅटेगिरी होत्या, त्यातील क्लासिक मध्ये मी होते. यात मला ‘विआ मिस अँड मिसेस इंडिया 2021’ च्या फस्ट रनरअप आणि मिसेस फोटोजेनीक हे टायटल असे दोन क्राऊन मिळाले आहेत.  या पूर्वी मी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभाग नोंदवलेला आहे, मात्र त्या पेक्षा वेगळा अनुभव या स्पर्धेतून मिळाला आहे. ग्रूमर, मेंटर यांच्याकडून शिकायला मिळाले, स्वतः ला सिद्ध करण्यासाठी हा मोठा प्लॅटफॉर्म होता, आमचा कॉन्फिडन्स दुप्पट वाढला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

यानिमित्ताने मला सांगावे वाटते की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्यात असलेल्या गुणांचे कॉन्फिडन्सने सादरीकरण करा आणि आपण करत असलेल्या कामावर प्रेम करा मग तुम्ही वयाचा विचार न करता स्वतःला सिद्ध करू शकता,  आज माझ्या कुटुंब, मित्र परिवार आणि हितचिंतकांच्या प्रेरणेमुळे मी बालपणी बघितलेले स्वप्न पूर्ण झाले आहे.

Previous Post
Dhananjay Munde 3

पुरात वाहून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या मादितीला धावले धनुभाऊ…

Next Post
Atul Bhatkhalkar And Uddhav Thackeray

‘राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारी मोडीत काढण्याचे सोडून ठाकरे सरकार टक्केवारी वसुली करण्यात व्यस्त’

Related Posts
Wikipedia

ईशनिंदा संबंधित सामग्रीचा वाद ;विकिपीडियाविरोधात पाकिस्तान सरकारने उचलले टोकाचे पाऊल

Wikipedia : पाकिस्तान सरकारने (Government of Pakistan) विकिपीडियाला पूर्णपणे काळ्या यादीत टाकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारने विकिपीडियावरील…
Read More
ऋतुजा लटके

ठाकरे गटाच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं; ऋतुजा लटके यांची उमेदवारीअडचणीत?

Mumbai – अंधेरी पोटनिवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष आहे. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या  उमेदवार ऋतुजा लटके यांचा प्रचार…
Read More
Jio

Jio च्या या 5 प्लॅनमध्ये मिळतेय मोफत Netflix, Amazon Prime सबस्क्रिप्शन, अमर्यादित कॉल आणि 500GB पर्यंत डेटा

Jio : रिलायन्स जिओकडे प्रीपेड, पोस्टपेड, आंतरराष्ट्रीय आणि जिओ फोन ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किंमती श्रेणींमध्ये अनेक योजना आहेत. Reliance…
Read More