T20 World Cup 2024 | यशस्वी जयस्वाल नाही, रोहितसोबत सलामी करू शकतो हा खेळाडू; कोहलीलाही नंबर-3 मिळेल

टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024 ) मध्ये आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांमध्ये अनुभवी फलंदाज विराट कोहली कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला आला आहे. विराट कोहली आतापर्यंतच्या ओपनिंगमध्ये प्रचंड फ्लॉप ठरला आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकाची (T20 World Cup 2024 )सुरुवात करताना विराट कोहलीने आतापर्यंत 1, 4 आणि 0 धावा केल्या आहेत. भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने क्रमांक-3 वर फलंदाजी करताना खूप धावा केल्या आहेत. अशा स्थितीत विराट कोहलीला पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाल्यास तो फॉर्ममध्ये परत येऊ शकतो.

हा खेळाडू रोहितसोबत सलामी करू शकतो
विराट कोहली आणि टीम इंडियाच्या समस्या एकच क्रिकेटर सोडवू शकतो आणि तो म्हणजे ऋषभ पंत. जर ऋषभ पंत टीम इंडियासाठी ओपनिंगला आला तर विराट कोहलीला नंबर-3 वर बॅटिंगसाठी मैदानात उतरवलं जाऊ शकतं. जर ऋषभ पंतने रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात केली तर टीम इंडियाला उजव्या आणि डाव्या हाताची सलामीची जोडी मिळेल. ऋषभ पंत सलामीला आला तर तो पहिल्याच चेंडूवर आक्रमण करेल. अशा स्थितीत रोहित शर्माला दुसऱ्या टोकाला सेट होण्याची संधी मिळेल.

कोहलीलाही नंबर-3 मिळेल
रोहित शर्मा, ऋषभ पंत, विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचे फलंदाजीचे क्रमांक निश्चित आहेत. अशा स्थितीत शिवम दुबेला सहाव्या क्रमांकावर मैदानात उतरवले जाऊ शकते. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे दोन फिरकीपटू टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनला आणखी मजबूत बनवतील. अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे भारतीय संघाला वेगवान गोलंदाजीत मजबूत करतील. एकूणच ऋषभ पंतची सलामी टीम इंडियाच्या विजयी जोडीला बिघडवणार नाही. मधल्या फळीतील फलंदाजातून ऋषभ पंत सलामीवीर बनला तर भारतीय क्रिकेट संघाला मोठा फायदा होईल कारण हा फलंदाज पहिल्या चेंडूपासूनच विरोधी संघावर दबाव निर्माण करेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like