नवी दिल्ली | ( Tahawwur Rana) २००८ मधील मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधारांपैकी एक तहव्वूर राणा सध्या एनआयएच्या कोठडीत आहे, आणि त्याच्यावर दररोज ८ ते १० तास कसून चौकशी केली जात आहे.
अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करून आणल्यानंतर दिल्लीतील न्यायालयाने राणाला १८ दिवसांची कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान त्याची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, वकिलांची भेट घेण्याचीही मुभा त्याला देण्यात आली आहे.
सूत्रांनुसार, राणा कोठडीत ( Tahawwur Rana) फक्त पेन, तीन कागद आणि कुराण या वस्तूंची मागणी केली होती आणि त्या त्याला उपलब्ध करून दिल्या आहेत.चौकशीदरम्यान २६/११ हल्ल्याचा कट नेमका कोणी, कुठे आणि कसा आखला यासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्याचा एनआयएचा प्रयत्न आहे.
तहव्वूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा अमेरिकी नागरिक असून, लष्कर-ए-तोयबाशी त्याचे संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याचे डेविड कोलमन हेडलीशीही संबंध होते, जो २६/११ हल्ल्यांमध्ये महत्त्वाचा सहभागी होता. एनआयएच्या चौकशीतून या हल्ल्याच्या अधिक खोल पातळीवरच्या दुव्यांवर प्रकाश पडण्याची शक्यता आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मेहुल चोक्सीच्या अटकेवर खासदार सुप्रिया सुळे यांची लक्षवेधी प्रतिक्रिया
पश्चिम बंगाल वक्फ कायदा विरोधातील हिंसाचार प्रकरणात अटक संख्या 150 वर
पुढे कोणतीही तनिषा भिसेसारखी घटना घडू नये यासाठी पावले उचलणार – Rupali Chakankar