Nana Patole | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीतील मित्रपक्षही लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत. दरम्यान आज पुण्यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत नाना पटोले यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. या सल्ल्यावरून महाविकासआघाडीमध्ये मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
नाना पटोले (Nana Patole) बैठकीत म्हणाले की, ” राष्ट्रवादीच्या विभाजनाचा आपण फायदा घेऊ, तसेच पुण्यातील जास्तीच्या जागा आपण पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करू. पुण्यामध्ये काँग्रेसची ताकद आहे, परंतु आता कार्यकर्त्यांनी काम करणे गरजेचे आहे. वेळेवर ब्लॉकच्या मीटिंग व्हायला हव्यात. उमेदवार कोण आहे यापेक्षा काँग्रेस संघटनेला महत्त्व द्या. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मतभेद न ठेवता एक दिलाने काम केल्यास यश आपलेच आहे”. असा सल्ला नाना पटोले यांनी दिली आहे.महाराष्ट्र टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप