फी साठी तगादा लावणाऱ्या शाळांवर तातडीने कारवाई करा, युवसेनेची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

varsha gaikwad

पुणे : राज्यात आज पासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. गेली दीड वर्ष बंद असणारे शाळांचे दरवाजे अखेर खुले झाले आहेत. विद्यार्थी प्रचंड उत्सुकतेने आज शाळांच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे निंदनीय आहे. शाळांच्या फी कमी करण्याबाबत आम्ही वारंवार निवेदन दिल्यानंतर अखेर शाळांच्या फी कमी करण्याचा अभिनंदनीय निर्णय आपण घेतलात. त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी याकरिता आम्ही वारंवार विनंती केली होती. योग्य नियमावली नसल्याने आज शाळा प्रशासन याचा गैरफायदा घेत आहे. फी न भरल्याने पुण्यातील एका शाळेने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारून गेटवरती उभं करण्यात आलं, या शाळेवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे युवासेनेच्या कल्पेश यादव यांनी केली आहे.

यादव म्हणाले, आज पुण्यात शाळांचा पहिला दिवस उजडताच विद्यार्थ्यांवर फी न भरल्याने गेटवर उभे राहण्याची वेळ आली. ही बाब निंदनीय आहे. यामुळे सर्वच विद्यार्थी-पालकांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शाळा प्रशासनाची ही मनमानी अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात टाकू शकते, तसेच पालकांना शिक्षण आणि विद्यार्थ्यांची जडणघडण याबाबतीत असणारी आस्था कायमची नष्ट होण्यास हे कारणीभूत ठरू शकतं.

राज्याचे शैक्षणिक हित जपण्यासाठी सदर शाळेवर तातडीने कारवाई करावी. आजपासून शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, तसेच पालकांसमोरील विविध अडचणी शिक्षण विभागापर्यंत पोचविण्यासाठी एक विशेष हेल्पलाईन क्रमांक चालू करण्यात यावा. अशी मागणी देखील यादव यांनी शिक्षणमंत्री गायकवाड यांच्याकडे केली आहे.

Previous Post
gavar

‘या’ पद्धतीने लागवड करून गवार पिकातून घ्या लाखोंचे उत्पादन !

Next Post
Subhash Deshmukh

सहकारी विद्यापीठ स्थापनेचा विचार व्हावा : आ.सुभाष देशमुख

Related Posts
Khadakwasla Dam | पुणेकरांची चिंता वाढली; खडकवासला धरणात आता 'एवढेच' पाणी शिल्लक 

Khadakwasla Dam | पुणेकरांची चिंता वाढली; खडकवासला धरणात आता ‘एवढेच’ पाणी शिल्लक 

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण (Khadakwasla Dam) प्रकल्पात अवघा 6 पूर्णांक 5 दशांश टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्यानं…
Read More

शेतकऱ्याच्या कष्टाला योग्य किंमत मिळावी यासाठी योग्य दिशा द्यावी लागेल – उद्धव ठाकरे

पुणे – केंद्रीय पातळीवर साखर उद्योगात भविष्यात येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन दूरगामी धोरण आखल्यास त्याचा सकारात्मक परिणाम या…
Read More