MP Muralidhar Mohol | पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करा! खासदार मोहोळ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

MP Muralidhar Mohol | पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करा! खासदार मोहोळ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

MP Muralidhar Mohol | पुणे शहरात कमी वेळेत अधिक पाऊस पडण्याचे प्रकार वारंवार होत असून यामुळे शहरातील काही स्पॅाटवर पाणी मोठ्या प्रमाणावर साचण्याचे प्रकार होत आहेत. यामुळे पुणेकरांना नाहक त्रास होत असून अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर काल नवनिर्वाचीत खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिल्ली येथून व्हर्च्युअल पद्धतीने पुणे महापालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत तात्पुरत्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांसदर्भात बैठक घेतली. यात पाण्याचा निचरा वेळेत करणे, आपात्कालीन यंत्रणा सतर्क ठेवणे, पाणी साठणाऱ्या स्पॅाटवर विशेष उपाययोजना करणे, पाणी साठवण्याची कारणे शोधणे अशा विविध बाबींवर सूचना दिल्या. शिवाय याबाबत कृती आराखडा तयार करुन तात्पुरत्या आणि दीर्घकालीन उपाययोजना काय आहेत? याचीही विचारणा मोहोळ (MP Muralidhar Mohol) यांनी अधिकाऱ्यांकडे केली.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पुणे शहरात पूरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या ठिकाणी उपाययोजनांची कामे प्रस्तावित असून याला कामांना तातडीने स्थायी समितीची मान्यता द्यावी आणि लगेच ‘वर्क ॲार्डर’ देण्यासंदर्भातही सूचना मोहोळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या कामांसाठी १४७ कोटी रुपयांची आवश्यकता असून सदर निधी केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या माध्यमातून लवकरात लवकर प्राप्त करुन देण्यासाठी मोहोळ स्वतः पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.

विशेष बाब म्हणजे, राज्य सरकारकडून पूर नियंत्रणासाठी आपण २०० कोटींचा विशेष निधी पुणे शहरासाठी आणला असून त्याबाबतच्या कामांच्या नियोजनाचा आढावाही यावेळी मोहोळ यांनी घेतला. शिवाय पुण्यात पुन्हा पहिल्या पावसासारखी परिस्थिती उद्भवू नये, यासाठीच्या स्पष्ट सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे आपात्कालीन व्यवस्थापनाचे फोन लागत नसणे आणि उचलत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, याबाबतही तातडीने यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या बैठकीस महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, पृथ्वीराज व्ही.पी., विद्युत विभाग प्रमुख श्रीनिवास कंदूल, सांडपाणी व्यवस्थापनचे संतोष तांदळे, आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख गणेश सोनुने यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Kamran Akmal | हरभजनने खडसावल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटरने वादग्रस्त वक्तव्यासाठी मागितली माफी, म्हणाला...

Kamran Akmal | हरभजनने खडसावल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटरने वादग्रस्त वक्तव्यासाठी मागितली माफी, म्हणाला…

Next Post
Ketaki Chitale | 'हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी,' अभिनेत्री केतकी चितळेची पंतप्रधान मोदींकडे मागणी

Ketaki Chitale | ‘हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी,’ अभिनेत्री केतकी चितळेची पंतप्रधान मोदींकडे मागणी

Related Posts
akhilesh yadav

वयोवृद्ध मुलायम सिंह यादव यांना मुलगा अखिलेश यादव यांच्यासाठी घ्यावी लागली सभा

करहल – समाजवादी पक्षाचे संरक्षक मुलायम सिंह यादव बऱ्याच दिवसांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना दिसले. गुरुवारी त्यांनी…
Read More

‘जानू विना रंगच नाय’ गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर झेबा शेखचं ‘दणकेबाज’ गाणंही ठरणार हिट

zeba shaikh: मराठी सिनेसृष्टीत सध्या आयटम साँगची चलती आहे. सध्या सर्वत्र या मराठी आयटम सॉंगचं राज्य असलेलं पाहायला…
Read More
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप, मयूरपंखी रथ ठरला भाविकांचे आकर्षण | Bhausaheb Rangari Ganapati

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप, मयूरपंखी रथ ठरला भाविकांचे आकर्षण

Bhausaheb Rangari Ganapati | सोनेरी मयुरपंखी रथाला गुलाब पुष्पांची आकर्षक सजावट आणि त्यावर कोल्ड फायरची विद्युत रोषणाई, ढोल…
Read More