Chandrashekhar Bawankule | निवडणुकीच्या तोंडावर दंगली घडणार, असे विधान करण्यापेक्षा शरद पवारांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांनां थांबवण्यासाठी पुढाकार घ्यावा. राजकारणासाठी महाराष्ट्राला बदनाम करू नका, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला.
ते नागपुरात बोलत होते. बावनकुळे म्हणाले, शरद पवारांना दंगली घडणार अशी भाषा का केली, त्यांच्या मनात काय आहे, हे माहिती नाही, परंतु, उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्त्वात महाराष्ट्रात अशी स्थिती कधीही येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आंबेडकरांच्या आरक्षणाच्या भूमिकेला कॉंग्रेसने कधीच मदत केली नाही.कॉंग्रेसने कधीही सामाजिक आरक्षण योग्य पद्धतीने हाताळले नाही, त्यांनी समाजा-सामजात वाद निर्माण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभेत हरविण्याचे काम केले, असेही नमूद केले.
• फडणवीसांची भूमिका प्रामाणिक
प्रकाश आंबेडकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर राजकीय टीका केली. फडणवीस यांना खलनायक ठरविण्याचे काम केले जात आहे. फडणवीस यांची मराठा समाजाच्या विषयात भूमिका प्रामाणिक आहे. त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत.
– ते असेही म्हणाले-
* महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसून निर्णय करणार, महायुतीचे सरकार महाराष्ट्रातील येईल. हे सरकार गरीब कल्याण योजना राबवणार आहे.
* अनिल देशमुख हे गृहमंत्री होते. दबाव आणण्यावर तेव्हाच का कारवाई केली नाही. अडीच वर्षानंतर संभ्रम निर्माण करत आहे. एवढे राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकासाचा विचार करावा.
* ज्या भागात नुकसान झालं त्याचं सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. मदत करण्यासाठी जनप्रतिनिधी म्हणून आम्ही जे काही करता येईल ते काम करत आहोत.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Prakash Ambedkar | ‘मनोज जरांगे विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी राज्यात एक नौटंकी सुरू आहे’