तुरीवरील शेंगा अळी नियंत्रणासाठी ‘या’ करा उपाययोजना

Tuar Daal

पुणे : सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. शेतकऱ्यांनी या किडींवर वेळीच उपाययोजना करावी, असे आवाहन कृषि सह संचालक (विस्तार व प्रशिक्षण) पुणे डॉ. तुकाराम मोटे यांनी केले आहे.

काही ठिकाणी अळीने तुरीवरील कळ्या, फुले व शेंगा फस्त करण्यास सुरुवात केली आहे. या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास ७० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था व प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते.

शेतकऱ्यांनी पाने व फुलांची जाळी करणारी अळीची प्रादुर्भावग्रस्त जाळी गोळा करून अळीराहीत नष्ट करून  शेंगा पोखरणारी अळीच्या मोठ्या अळ्या हाताने वेचून त्यांचा नायनाट करावा.  तूर पिक कळी लागण्याच्या अवस्थेत आल्यापासून एकरी २ कामगंध सापळे (फेरोमोन ट्रॅप) पिकाच्या वर एक फूट उंचीवर लावावेत व निरिक्षण करावे.

शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या किमान एक ते दोन फूट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी ५० ते ६० ठिकाणी उभारावेत. पिक कळी अवस्थेत असतांना निंबोळी अर्क ५ टक्केची किंवा अझेंडीरॅक्टिन ३०० पीपीएम ५ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.अळी प्रथम व द्वितीय अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूची ५ मिली १० लिटर पाण्यातून संध्याकाळच्या वेळेला फवारणी करावी.

किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५, एसजी ४.४ ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड ३९.३५ एससी २ मिली किंवा क्लोरेनट्रीनीलीप्रोल १८.५ एससी ३ मिली किंवा क्लोरॅनट्रीनीलीप्रोल ९.३ + लॅमडा साहॅलोथ्रीन ४.६ झेडसी ४ मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.(If insect infestation is found above economic loss level, one of the following insecticides: Emamectin Benzoate 5, SG 4.4 g or Flubendamide 39.35 SC 2 ml or Chlorantriniliprole 18.5 SC 3 ml or Chlorantriniliprole 9.3 + Lambda Sahalothrin 4.6 ZC 4 ml Mix with 10 liters of water and spray.).

मारुका इंडोक्झाकार्ब (Maruca indoxacarb)१४.५ एससी ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीटकनाशकाचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी मात्रा तीन पट वापरावी. शेतात किटकनाशकांचा वापर करतांना हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा व सुरक्षिततेची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

Previous Post
Chandrakant Patil

समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक- चंद्रकांत पाटील

Next Post
Cold

Year Ender 2022 : हे 6 आजार आणि घरगुती उपाय 2022 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले

Related Posts
चंद्रकांत खैरेंच्या मुलाच्या ऑडिओ क्लिपने खळबळ; राजकीय भूकंपाची शक्यता 

चंद्रकांत खैरेंच्या मुलाच्या ऑडिओ क्लिपने खळबळ; राजकीय भूकंपाची शक्यता 

Aurangabad News: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचा मुलगा ऋषिकेश खैरे हे  एका वेगळ्या…
Read More

पुढील आठवड्यात आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा होणार, ‘हे’ दोन दिग्गज खेळाडू वापसी करणार

Asia Cup 2023, Team India Squad: 2023 आशिया चषक सुरू होण्यासाठी 20 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. मात्र,…
Read More

समीर वानखेडे हा खोट्या केसेस करुन लोकांना अडकवत आहे – मलिक

मुंबई – आर्यन खान याचा ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही म्हणजे हा फर्जीवाडा होता हे आता…
Read More