लावण्या प्रकरणात तमिळनाडू सरकारची असंवेदनशीलता समजावी की षडयंत्र ?

पुणे – तमिळनाडूतील तंजावर जिल्ह्यातील सेक्रेड हायस्कूल मध्ये शिकत असलेल्या लावण्याला धर्मांतराच्या दबावामुळे आत्महत्या करण्यास भाग पाडले. या प्रकरणात तिला न्याय मिळवून देण्यासाठी अभाविप संघर्ष करत आहे, तर हे प्रकरण इथेच दडपून राहावे म्हणून अभाविप च्या कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. हे सर्व दृश्य पाहता, तमिळनाडू सरकार असंवेदनशील आहे का हे सर्व एक षडयंत्र आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

९ जानेवारी २०२२ ला धर्मांतरासाठी होत असलेल्या सतत च्या जाचाला वैतागून लावण्याने किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा ती शुद्धीवर आली, आणि मृत्यू च्या आधी एका व्हिडिओ मध्ये तिचा त्रास व्यक्त केला. दोन वर्षांपूर्वी तिच्या शाळेतील काही अधिकाऱ्यांनी तिला व तिच्या आईवडिलांना ख्रिश्चन धर्मात परिवर्तन करावे, असे केल्यास तिच्या पुढील शिक्षणाची काळजी ते घेतील सांगण्यात आले. पण यासाठी लावण्याने व तिच्या आईवडिलांनी साफ नकार दिला. यामुळे, तिला विविध प्रकारच्या जाचाला सामोरे जावे लागले. या जाचाला वैतागून अखेर १९ जानेवारी २०२२ ला किटकनाशक पिऊन लावण्याने तिची जीवनयात्रा संपवली.

निक पोलिसांकडून आपल्याला मदत मिळणार नाही हे लक्षात आल्यावर लावण्याच्या आईवडिलांनी २१ जानेवारी ला मद्रास उच्च न्यायालयाकडे सीबीआय ची मागणी करत याचिका दाखल केली. ३१ जानेवारी ला मद्रास उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश सीबीआय कडे सोपावले. तर या आदेशाविरोधात तमिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांच्या या कृत्यावरून त्यांची असंवेदनशीलता तसेच हे प्रकरण दडपून ठेवण्याचे चाललेले त्यांचे आटोकाट प्रयत्न चांगलेच लक्षात येत आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून, उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत हे प्रकरण सीबीआय कडे सोपविण्याचे आदेश दिले.

लावण्याला न्याय मिळावा आणि जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराविरोधात कायदा करावा यासाठी तमिळनाडू चे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या घरासमोर अभाविप चे कार्यकर्ते शांततेत निदर्शने करत होती, तेव्हा तेथील पोलीसांनी असंवैधानिक पद्दतीने अभाविप च्या राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी व इतर कार्यकर्त्यांना अटक केली. लावण्याला न्याय मिळावा म्हणून अभाविप संघर्ष करत आहे, आणि हे प्रकरण दडपवण्यासाठी तमिळनाडू सरकार पोलीसांना समोर करून कार्यकर्त्यांना अटक करत आहे.

हे सर्व प्रकरण पाहिल्यावर अस लक्षात येत की महाराष्ट्रात देखील जनजाती भागात अनेक ठिकाणी ख्रिश्चन मिशनरी जनजाती बांधवांना धर्म परिवर्तन करण्यास प्रवृत्त करत आहेत.लावण्या प्रकरणात तमिळनाडू सरकारची असंवेदनशीलता आहे की हे सर्व एक षडयंत्र आहे असा प्रश्न अभाविप चे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी आज च्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला. यावेळी, अभाविप चे पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल उपस्थित होते.