तस्लिमा नसरीन : पुरुषप्रधान धर्मसंस्थेविरुद्ध बंड करणारी बांगलादेशी लेखिका

तस्लिमा नसरीन बांगलादेशच्या सुप्रसिद्ध लेखिका आहेत, त्यांनी आतापर्यंत अनेक पुस्तके लिहिली आहेत. ‘लज्जा‘ या कादंबरीमुळे प्रसिद्ध पावलेल्या वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांचं वर्णन ‘पुरुषप्रधान धर्मसंस्थेविरुद्ध बंड पुकारलेल्या लेखिका‘ असं करता येईल.या चित्रपटानंतर त्यांच्याविरुद्ध फतवा काढण्यात आला. सनातनी धर्मबांधवांनीच मृत्युदंडाचा फतवा काढल्याने तस्लीमांना मायभूमीतून भूमिगत होऊन काही काळ युरोपमध्ये व नंतर भारतात आश्रय घ्यावा लागला.

बांगलादेश हा मुस्लिम देश आहे, म्हणूनच त्यांना देशसोडवा लागला. त्यानंतर त्यांनी काही काळ भारतात आश्रय घ्यावा लागला. त्यांनी स्वीडनचे नागरिकत्व स्वीकारले असले तरीही त्या बराच काळ भारतात असतात. तस्लिमा यांचा जन्म इ.स. १९६२ मध्ये ढाक्याजवळील मायमेनसिंग इथे झाला. वैद्यकीय शिक्षण घेऊन भूलतज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या तस्लीमा यांनी वृत्तपत्रातून स्त्री समस्यांबाबत स्तंभलेखन सुरू केलं. १९८६ साली ‘शेकोरी बिपुल खुदा खुदा‘ हे त्यांचं पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं. त्यानंतर त्यांनी लेखसंग्रह, कथासंग्रह, काव्यसंग्रह मिळून एकूण १६ पुस्तकं लिहिली आहेत.

इस्लामिक धर्मांधतेविरुद्ध लेखन आणि वक्तव्यामुळे त्या मुस्लिम कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर नेहमीच असतात. ६ डिसेंबर, १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यावर त्याच्या प्रतिक्रिया बांगला देशातही उमटल्या. याच काळात तस्लिमा नसरीन यांनी त्यावेळी तिथे अल्पसंख्यांक हिंदू कुटुंबावर कसे अत्याचार झाले, त्याचं वर्णन करणारी ‘लज्जा‘ ही कादंबरी लिहिली. या कादंबरीमुळे त्या प्रकाशझोतात आल्या.

एका कर्मठ कुटुंबात जन्म झाला, तरी स्वतंत्र विचारांमुळे त्या बंडखोर बनल्या. जगातील सर्व धर्म स्त्रीवरील अत्याचारास खतपाणी घालतात म्हणून आपण निधर्मी व नास्तिक आहोत, अशी उघड भूमिका त्यांनी घेतली. इस्लामवर भाष्य केल्यामुळे त्याच्यावर हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. त्या मुलाखतींमध्ये, ती बऱ्याच वेळा त्यांच्या देशात बांगलादेशला परत जाण्याबद्दल बोलतात मात्र त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू होण्याच्या धोक्यामुळे त्या तिथे जाऊ शकत नाही.

आमार मेयबेला‘ हे त्यांचं आत्मचरित्रही खूप वादग्रस्त ठरलं. पारंपरिक धर्मनिष्ठ विचार व रूढी या विरोधात उभ्या राहिल्यामुळे त्यांना कडव्या प्रतिकाराला सामोरं जावं लागलं. मायभूमी सोडून १९९४ पासून नसरीन यांनी भारतात ‘तात्पुरता’ आश्रय घेतला व नंतर भारतातही त्यांच्या वास्तव्याबद्दल वाद निर्माण झाल्यावर २००८ साली पुन्हा त्यांनी युरोपात आश्रय घेतला.