Tata Motors ने प्रवासी वाहनांच्या किमती सरासरी 1.2% ने वाढवल्या; जाणून घ्या नेमका काय होईल परिणाम

Tata Motors Price Hike: देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. वाढलेल्या किमती १ फेब्रुवारी २०२३ पासून लागू होतील. कंपनीने इंटरनल कम्बशन इंजिन (ICE) वर आधारित प्रवासी वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा मोटर्सच्या मते, सरासरी आधारावर, मॉडेल आणि प्रकारानुसार पेट्रोल आणि डिझेल इंजिन असलेल्या प्रवासी वाहनांच्या किंमती 1.2 टक्क्यांनी वाढतील.

पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून, पेट्रोल आणि डिझेल इंजिन असलेली टाटा मोटर्सची प्रवासी वाहने सरासरी 1.2 टक्क्यांनी महाग होतील. कंपनीच्या इलेक्ट्रिक सेगमेंटच्या वाहनांवर नुकत्याच झालेल्या दरवाढीच्या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही. नियमातील बदल आणि वाहनांच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणार्या स्पेअर पार्ट्सची जास्त किंमत (इनपुट कॉस्ट) यामुळे सध्याच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

टाटा मोटर्सने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, नियामक बदलांमुळे आणि सर्व प्रकारच्या इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीने प्रवासी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, 1 फेब्रुवारी 2023 पासून पेट्रोल-डिझेल इंजिनवर चालणाऱ्या प्रवासी वाहनांच्या किमतींमध्ये व्हेरिएंट आणि मॉडेलनुसार सरासरी 1.2 टक्के वाढ होईल.