शिक्षकाने आपल्या पत्नीसाठी बनवला ताजमहल…

मुंबई : आग्राचा ताजमहाल तर सर्वांनाच सर्वश्रुत आहे या सारखी प्रतिकृती जगात दुसरी नाही असे म्हंटले जात होते, परंतु आता ते खरे ठरणार नाही, कारण या ताजमहालचीच हुबेहूब दुसरी प्रतिकृती जसाचा तसा दुसरा ताजमहाल अस्तित्वात आलाय आणि तो म्हणजे मध्यप्रदेशातील बुरहानपूर येथील शिक्षणतज्ञ आनंद प्रकाश चौकसे यांनी आपले घर हुबेहुब ताजमहाल सारखे बनवले आहे… जे त्यांनी आपल्या पत्नी ला भेट दिले आहे, 3 वर्षांत बनवलेल्या या घरात 4 बेडरूम आहेत, ज्यात 2 बेडरूम खाली तर 2 बेडरूम वरती आहेत… यामध्ये एक मोठा हॉल, किचन, लाइब्रेरी आणि मेडिटेशन रूम देखील आहे…

पत्नी मुमताजची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुघल बादशाह शाहजहाने ताजमहाल बांधून आपल्या पत्नीला पिढानपिढ्या प्रेमाचे प्रतिक राहिल अशी भेट दिली, जे जगातील सात आश्चर्यापैकी एक आर्श्चय आहे, मात्र ज्या बुऱ्हाणपूर ला मुमताज चे निधन झाले होते, आणि जिथे सहा महिने मुमताज ला ठेवण्यात आले त्याच ऐतिहासिक बुऱ्हाणपूर शहरात एक ध्येयवेड्या शिक्षकाने साकारला आहे दुसरा ताजमहाल… ज्याची चर्चा सगळीकडे होत आहे, बुरहानपूरचे शिक्षणतज्ञ आनंद प्रकाश चौकसे यांनी आपल्या पत्नी मंजूषा चौकसे यांना ताजमहाल सारखा 4 बेडरूम असलेले घर भेट दिले आहे, त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

त्याचे झाले असे की कधीकाळी आनंद चौकसे हे आपल्या पत्नीसह ताजमहाल पाहण्यासाठी आग्राला गेले होते, त्यांनी त्याठिकाणी बारकाईने ताजमहलाचे निरीक्षण केले आणि घरी बुरहानपूरला आलावर त्यांनी याबाबत इंजिनिअरशी चर्चा केली, यावेळी त्यांनी आपल्याला ताजमहाला सारखचं घर बनवायचे हे त्यांनी ठरवले, सुरवाती पासून अगदीच अशक्य वाटणारे हे कार्य आनंद चौकसे यांच्या कठोर मेहनत आणि ध्यासामुळे पूर्णत्वस गेले आहे, बुरहानपूर येथे घराचे क्षेत्रफळ 9 मध्ये मिनारासहित 6` बेसिक स्ट्रक्चर वर बांधले आहे , तर घराची उंची 29 फूट आहे.

या ताजमहाल घराला इंडियन कंस्ट्रक्टिंग अल्ट्राटेक आउट स्टैंडिंग स्ट्रक्चर ऑफ मध्यप्रदेश हा पुरस्कार मिळालेला आहे, ज्याला आनंद चौकसे यांनी आपल्या पत्नी मंजूषा चौकसे यांना गिफ्ट केले आहे, या बांधकामामध्ये आग्रा ताजमहाल प्रमाणे संपूर्ण मार्बलचाच वापर करण्यात आला असून त्यावर नक्षीकाम करण्यासाठी आग्रा येथुन कारागीर बोलावले गेले, बुऱ्हाणपूर इंदोर आणि आग्रा येथील कारागिरांनी मिळून तीन वर्षांत ताजमहाल ची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. जगात फक्त प्रेम आणि प्रेमच रहावे हा संदेश यातून आपणाला द्यायचा आहे, असे आंनद चौकसे सांगतात, नावातच आंनद असलेल्या चौकसे यांनी पत्नीलाच नव्हे तर बुऱ्हाणपूरच्या ऐतिहासिक नगरीतही आनंद पसरवला आहे.