क्रिकेट विश्वचषकाच्या एकूण बक्षीस रकमेपेक्षा 64% जास्त रक्कम एकही सामना जिंकू न शकलेला संघाने  मिळवली 

अर्जेंटिना आणि फ्रान्स सोडा, एकही सामना न जिंकलेल्या संघांनाही बक्कळ पैसा मिळाला

FIFA World Cup 2022 Prize Money: FIFA World Cup 2022 च्या फायनलमध्ये अर्जेंटिनाचा संघ फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव करून चॅम्पियन बनला.(Argentina beat France 4-2 in penalty shootout to become champions of FIFA World Cup 2022) यानंतर लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील संघाने बक्षीस म्हणून ३४७ कोटी रुपये मिळाले. फ्रान्सला २४८ कोटी रुपये मिळाले. अर्जेंटिना आणि फ्रान्स सोडा, एकही सामना न जिंकलेल्या संघांनाही भरपूर पैसा मिळाला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियात नुकताच T20 विश्वचषक पार पडला. त्याची एकूण बक्षीस रक्कम 46 कोटी रुपये होती.तर दुसऱ्या बाजूला FIFA विश्वचषक 2022 मध्ये एकही सामना जिंकू न शकलेल्या संघाने यापेक्षा 64% जास्त पैसे मिळाले . यजमान कतार संघाला एकही सामना जिंकता आला नाही. तरीही त्यांना ७४ कोटी रुपये मिळाले. FIFA विश्वचषक 2022 ची एकूण बक्षीस रक्कम सुमारे 3640 कोटी रुपये होती. मागील विश्वचषकाच्या तुलनेत ही रक्कम 330 कोटी रुपये अधिक आहे.(Teams that did not win a single match received 64% more than the total prize money of the Cricket World Cup.).

तीसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या क्रोएशियाच्या संघाला २२३ कोटी रुपये मिळाले. चौथ्या क्रमांकावर असलेल्या मोरक्कन संघाला 206 कोटी रुपये मिळाले . पोर्तुगाल, ब्राझील, नेदरलँड आणि इंग्लंडचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीत संपला. चारही संघांना 140-140 कोटी रुपये मिळाले.

युनायटेड स्टेट्स, सेनेगल, जपान, ऑस्ट्रेलिया, पोलंड, स्पेन, स्वित्झर्लंड आणि दक्षिण कोरिया यांनी फेरी 16 च्या पुढे प्रगती केली नाही. त्यांना 107-107 कोटी रुपये मिळाले. दुसरीकडे, ज्या संघांना ग्रुप स्टेजच्या पुढे प्रगती करता आली नाही त्यांना प्रत्येकी 74 कोटी रुपये मिळाले. हे संघ कतार, इक्वेडोर, वेल्स, इराण, जर्मनी, कोस्टा रिका, सर्बिया ट्युनिशिया, कॅनडा, मेक्सिको, सौदी अरेबिया, डेन्मार्क, बेल्जियम, कॅमेरून, घाना आणि उरुग्वे (Qatar, Ecuador, Wales, Iran, Germany, Costa Rica, Serbia, Tunisia, Canada, Mexico, Saudi Arabia, Denmark, Belgium, Cameroon, Ghana and Uruguay) आहेत.