बर्फी, रुस्तम, मै तेरा हिरो, पागलपंती, द बिग बुल, हॅप्पी एन्डींग अशा अनेक सिनेमांतून झळकलेली इलियाना डिकु्झ आजच्या घडीला बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक.
तिने अभिनयासोबतच सुंदर चेहरा आणि हॉट फिगरच्या जोरावर बॉलीवूडमध्ये आपलं नाव कमावलं. इलियाना नेहमीच आपल्या सोशल मीडियावर वर्कआऊट करतानाचे अनेक व्हिडीओ किंवा फोटो शेअर करीत असते. नुकतेच इलियानाने वर्कआऊट करतानाचे तिचे शेअर केलेले काही फोटोज् आणि त्यावर तिने लिहिलेली पोस्ट व्हायरल होत आहे. इलियानाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत.
इलियानाने शेअर केलेल्या फोटोवर तिने लिहिले आहे की,”वर्कआऊटनंतर जेव्हा बॉडीला रीलॅक्स करायचं असतं त्यावेळी माझ्या ट्रेनरने सूचना दिली की आता तुमचे दोन्ही हात बाजूला ठेवा आणि स्वतःला घट्ट अलिंगन द्या. आपण जी मेहनत शरीरावर घेतोय त्याबद्दल आपलं शरीर आपल्याला साथ देतंय यासाठी त्याचे कृतज्ञ व्हा. हे ऐकताच मी भावनिक झाले आणि मला अक्षरशः रडू आलं. वर्कआऊटनंतर याआधी मी अशाप्रकारे कधीच रिअक्ट झाले नव्हते. तुम्हीसुद्धा ही गोष्ट नक्की करून पहा.”(रेड हार्ट इमोजी)या पोस्टपुढे तिने दिला आहे.
काही दिवसांपूर्वी इलियानाने एका मुलाखतीत म्हटले होते की,”दहा-बारा वर्षांची असताना माझ्या शरीर रचनेविषयी मला न्यूनगंड होता. मला त्यावेळी लोकांच्या घाणेरड्या कमेंट्सचा खूप त्रास सहन करावा लागला होता. लोक म्हणायचे,’तुझे नितंब एवढे मोठे का आहेत?’. तेव्हा लाज वाटायची,कारण ती एक माझी शारिरीक समस्या होती. लोक जेव्हा असं बोलतात तेव्हा आपला त्यावर विश्वास बसू लागतो आणि आपली मनःस्थिती त्यामुळे ढासळते. खूप वर्ष ही सल माझ्या मनात कायम रुजून राहिली होती. ती माझ्या मनातून काढण्यासाठी मला स्वतःला खूप समजवावं लागलं. मी स्वतःवर खूप मेहनत घेतली. लोकं जे बोलतात त्यापेक्षा मला स्वतःबद्दल काय वाटतं हे म्हत्त्वाचं हे मी स्वतःलाच समजावलं. आणि आज हेच मी स्वतःच्या मनाला प्रत्येक बाबतीत समजावत असते.” इलियानाने 2017मध्ये तिच्या शरीराच्या समस्येसंदर्भात भाष्य केलं होतं.
इलियाना शेवटची ‘द बिग बुल’ मध्ये दिसली होती. ज्यामध्ये तिने मीरा राव या पत्रकाराची भूमिका साकारली होती. आता इलियाना रणदीप हुड्डासोबत ‘अनफेअर अँड लव्हली’ मध्ये दिसणार आहे. ती शिर्षा गुहा ठाकुर्ता दिग्दर्शित एका रोमँटिक कॉमेडी-ड्रामामध्ये देखील काम करीत आहे. या सिनेमात विद्या बालन, प्रतीक गांधी आणि सेंधील रामामूर्ती हे कलाकार देखील दिसणार आहेत.
https://youtu.be/3AmlxDP4tcU