तेजस्विनी पंडितचं दिग्दर्शक संजय जाधव यांच्यासोबत सुरू आहे अफेयर? अभिनेत्री म्हणाली…

मुंबई- लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिला मराठी सिनेइंडस्ट्रीतील अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. तिने तिच्या कसदार अभिनयाच्या जोरावर केवळ सिनेमेच नव्हे तर मालिका, वेब सीरिज अशा वेगवेगळ्या माध्यमांत काम केले आहे. तिच्या हटके भूमिकांनीही तिला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. तेजस्विनी पंडित ही सध्या तिच्या ‘बांबू’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने प्लॅनेट मराठीच्या नव्याने सुरू झालेल्या ‘पटलं तर घ्या’ कार्यक्रमात तेजस्विनीने हजेरी लावली होती. कार्यक्रमात तिला तिच्या आयुष्यातील सगळ्यात चांगल्या आणि वाईट अफेवेबद्दल विचारणा करण्यात आली. यावेळी लोकप्रिय मराठी दिग्दर्शक संजय जाधव (Director Sanjay Jadhav) यांच्यासोबतच्या रिलेशनशीपबद्दलच्या अफवांवरही तेजस्विनीला विचारणा करण्यात आली.

तेव्हा बोलताना तेजस्विनी म्हणाली, ‘माझं आणि संजय जाधव याचं अफेअर (Tejaswini Pandit & Sanjay Jadhav Affair)आहे ही माझ्याबद्दल पसरलेली सगळ्यात वाईट अफवा होती. माझ्यासाठी ही गोष्ट अनपेक्षित होती. संजय दादा आणि माझं अफेअर आहे हे ऐकणं माझ्यासाठी वाईट होतं. कारण मी त्याला दादा म्हणते. तो माझा दादा आहे. आम्ही दोघेही खूप घट्ट आहोत. आमच्यातलं नातं खूप घट्ट आहे. दादा मला त्याच्या मुलीसारखी वागणूक देतो. तो माझ्यात आणि त्याची मुलगी द्वितीमध्ये मुळीच फरक करत नाही. तो मला त्याच्या मुलीप्रमाणे वागणूक देतो. त्यामुळे आमच्या नात्याबद्दल पसरलेली ही अफवा खरंच वाईट होती.’

संजय आणि तेजस्विनी यांनी ‘तू ही रे’, ‘अगं बाई अरेच्चा’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘अनुराधा’ यांसारख्या चित्रपटात आणि वेबसीरीजमध्ये काम केलं आहे. तेजस्विनीचा ‘बांबू’ हा चित्रपट २६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.