मुंबई | (Swami Anand Swaroop) राज्य सरकारने शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून याला तीव्र विरोध झाला. मराठी भाषेच्या अस्मितेचा प्रश्न उचलत अनेक राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले. वातावरण इतकं तापलं की अखेर फडणवीस सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला.
या पार्श्वभूमीवर आज वरळी डोम येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मराठी विजयी मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, राज्यभरातून नागरिक मोठ्या संख्येने मेळाव्याला हजर झाले आहेत.
मात्र याचवेळी काली सेनेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरुप (Swami Anand Swaroop) यांनी एक वादग्रस्त विधान करून नवा राजकीय वाद पेटवण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी एक्स (Twitter) वर एक व्हिडीओ पोस्ट करत, “मी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनाही खुले आव्हान देतो. लवकरच मुंबईत येईन आणि तिथे उभा राहून हिंदीत बोलेन, बघूया कोण मला थांबवतं,” असं म्हटलं.
यातच त्यांनी पुढे “औकात असेल तर मला हात लावून दाखवा. जर मी हात तोडून टाकले नाही, तर बघाच!” असा संतप्त इशाराही दिला आहे. त्यांच्या या आक्रमक आणि भडकावू भाषेने महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
“एकनाथ शिंदे आता मुजरा पण करतील”, संजय राऊतांचा खोचक टोला
“शरद पवारांनीही जय कर्नाटक म्हटले होते याचा अर्थ…”, फडणवीस यांच्याकडून शिंदेंचा बचाव