ठाकरे सरकारकडून मुंबई पोलिसांची चेष्टा, दिवाळी बोनस म्हणून 750 रुपये

ठाकरे सरकारकडून मुंबई पोलिसांची चेष्टा, दिवाळी बोनस म्हणून 750 रुपये

मुंबई : कोरोना काळात आपल्या जीवाचे रान करून काम करणाऱ्या पोलिसांची ठाकरे सरकारला खर्च कदर आहे का असा सवाल आज उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण दिवाळी भेट देताना सरकारने मुंबई पोलिसांची मात्र चेष्टा केल्याचं पहायला मिळत आहे. कोरोना काळात दिवस-रात्र नागरिकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून कायदा व सुवस्थेचं काम पाहणाऱ्या मुंबई पोलिसांना सरकारने मात्र केवळ 750 रुपये दिवाळी भेट जाहीर केली आहे.

विशेष म्हणजे या बोनस साठी देखील सरकारने अनेक नियम अटी शर्थी ठेवल्या आहेत. मुंबई पोलिसांना दिवाळी भेटीच्या निमित्ताने सबसिडी कँटिनमधून त्याच्या नावे डेबिट व क्रेडिट कार्डवर 750 रुपये (प्रति कर्मचारी) इतक्या रकमेची खरेदी विनामूल्य करता येणार आहे. ही भेट पोलिसांसाठी असलेल्या पोलीस कल्याण निधीतून दिली जाणार आहे.

ठरलेल्या रक्कमेच्या वरती खरेदी केल्यास ते पैसे त्यांना स्वत: द्यावे लागणार आहे. हे पत्र मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या नावे काढण्यात आलं आहे. पालिका, बेस्ट कर्मचारी आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून चांगली रक्कम दिली जात असताना पोलिसांना मात्र 750 रुपये दिवाळी भेट देऊन सरकारने त्यांची चेष्टाच केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=GmVj7hqrh5o&t=1s

Previous Post
गावात लसीकरणाचा टक्का घसरल्यास सरपंच-सदस्यांना गमवावी लागणारे पदे?

गावात लसीकरणाचा टक्का घसरल्यास सरपंच-सदस्यांना गमवावी लागणारे पदे?

Next Post
आरोग्य विभाग पदभरती परिक्षेबाबत व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ बाबत खुलासा करण्याची युवासेनेची मागणी

आरोग्य विभाग पदभरती परिक्षेबाबत व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ बाबत खुलासा करण्याची युवासेनेची मागणी

Related Posts
पोलिसांनी अखेर 'त्या' तीन नराधमांना अटक केली; आरोपींचे भाजप कनेक्शन देखील आले समोर

पोलिसांनी अखेर ‘त्या’ तीन नराधमांना अटक केली; आरोपींचे भाजप कनेक्शन देखील आले समोर

वाराणसी : आयआयटी बीएचयूच्या (IIT BHU) विद्यार्थिनीचा विनयभंग आणि अत्याचार केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ब्रिज…
Read More

Gmail स्टोरेज फुल्ल झाल्यावर काय कराल? स्टेप बाय स्टेप शिका

पुणे – जगभरात Gmail चे अनेक वापरकर्ते आहेत. गुगल जीमेलची सेवा पुरवते. आपण वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारे…
Read More

घरबसल्या आधार कार्डवरील मोबाइल नंबर असा करा अपडेट

आधार कार्ड सध्या सर्व भारतीयांची एकमेव ओळख बनला आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला इतर कोणतीच…
Read More