कुटुंबाला ACB ची नोटीस आल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी दिला सरकारला शाप, म्हणाले,…

Rajan Salvi  : ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या पाठोपाठ आता त्यांच्या कुटुंबीयांच्याही अडचणी वाढणार आहेत. त्यांच्या कुटुंबालाही एसीबीची (ACB) नोटीस बजावण्यात आली आहे. राजन साळवी यांचा मोठा भाऊ, पत्नी आणि वहिनीला एसीबीनं नोटीस बजावली आहे. 20 मार्च रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

एसीबीच्या नोटीशीबद्दल साळवी म्हणाले की, “जे आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले त्यांना सरकारी संस्थांच्या माध्यमातून नोटीसा पाठवल्या आहेत. परंतु जे लोक भाजपात किंवा शिंदे गटात गेले त्यांना नोटिसा येत नाहीत. तिकडे गेले की सर्व नेते वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ होतात आणि आम्हाला दोषी ठरवलं जातं. देशात आणि राज्यात त्यांचं सरकार आहे. सर्व केंद्रीय यंत्रणा त्यांच्या ताब्यात असल्यामुळे आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून या सरकारला माझा शाप आहे.  दरम्यान, साळवी म्हणाले की, “तुमचं टार्गेट मी आहे आणि तुम्ही मला नोटीस पाठवली तर माझ्या माध्यमातून माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका. तसेच माझ्या भागातले स्थानिक ठेकेदार आणि सरपंचांना त्रास देऊ नका.”