संजय राऊत यांच्याबद्दल मला निश्चित अभिमान आहे – ठाकरे 

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी (ED custody) सुनावण्यात आली आहे. ईडीने आठ दिवसांसाठी संजय राऊत यांची कोठडी द्यावी अशी मागणी न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना केली होती. मात्र त्यांना 4 दिवसांची कोठडी सुनावली आहे. न्यायमुर्ती एम जी देशपांडे यांनी सुनावणी घेतली होती.

दरम्यान वैद्यकीय कारणास्तव रात्री १०.३० नंतर संजय राऊत यांची चौकशी करणार नाही अशी हमी यावेळी ईडीने कोर्टात दिली आहे. विशेष सरकारी वकीत हितेन यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला १ कोटी सहा लाखांचा फायदा झाल्याचं सांगितलं. ईडीने यावेळी प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे फ्रंट मॅन असून आमच्याकडे किहीममधील जमीन विक्रेत्यांचे काही मालमत्तांबाबत जबाब असल्याची माहिती दिली. पुराव्यांसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही यावेळी ईडीकडून कऱण्यात आला.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राऊत यांची पाठराखण केली आहे. ते म्हणाले,  संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दल मला निश्चित अभिमान आहे. संजय माझे जुने मित्र आहेत. मी आताच त्यांच्या कुटुंबियांना भेटून आलो. त्यांचा काय गुन्हा आहे, जे पटत नाही त्याविरोधात बोलतात. मरण आलं तरी शरण जाणार नाही, हे त्यांचं वाक्य अतिशय चांगलं आहे,अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या अटकेसह, भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा (BJP president JP Nadda) यांनी प्रादेशिक पक्षांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन टीका केली.