राज्यात ठाकरे-पवार पॅटर्नचा बोलबाला मग त्यात कॉंग्रेसचा पत्ता कुठे ?

तीन पक्षाच मिळून राज्यात महाविकास अघाडीच सरकार तयार झाल त्याला दोन वर्षे पुर्णही झाले. सरकार चालवताने रुबाब आहे तो केवळ राष्ट्रवादी पक्षाचा नंतर शिवसेनेचा. सतेच्या राजकारणात कांग्रेस कुठे दिसत ? त्याहून अधिक म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे लोक सहकारी काँग्रेसला डोक पण वर काढू देत नाही , समान वाटा मिळत नाही. निधी मिळत नाही आशा तकारी अनेकदा मंत्रीच करतात तो भाग . पण परवा शिवसेना नेते संजय राउतांनी पुण्यात बोलतांना जाहिरपणे सांगुन टाकल ते म्हणजे राज्यात फक्त ठाकरे पवार पॅटर्नचा बोलबाला चालतो. काँग्रेस पक्षाच नाव न घेता अस बोलणे एक प्रकारे कॉंग्रेसचा जाहिर आपमान करणे असाच.

महाराष्ट्रात महा विकास आघाडीची स्थापना ज्यावेळी झाली त्या वेळी राहुल गांधींना पाठिंबा द्यायचा का नाही यासाठी तब्बल एक महिना ठाकरे आणि पवारांना वेटिंग वर ठेवलं होतं. त्याचं कारण कदाचित काँग्रेस नेतृत्व हा धोका ओळखूनच असावेत, पण राज्यातील सत्तेसाठी आसुसलेल्या काँग्रेसजनांनी अखेर गांधी यांची समजूत घातली आणि एखाद्या बोक्याने लोण्याच्या गोळ्यावर उड्या माराव्या तसं ही मंडळी सत्तेच्या खुर्चीवर जाऊन दोन वर्षे होऊन गेली राज्यात हे सरकार आहे. सरकार मधील सर्व निर्णय आणि धोरण राष्ट्रवादी व शिवसेना ठरवते हे आता सर्वश्रुत आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी शिवसेनेला आपल्या दोरखंड आत बांधून ठेवल्या सारखं ठेवल आहे. त्यामुळे मोठे साहेब सांगतील तीच प्रक्रिया आणि तोच निर्णय मुख्यमंत्री असलेल्या पक्षाला राज्यात राबवावा लागतो. दोन वर्षाच्या कालावधीत सत्ताधाऱ्यांनी जे काही निर्णय घेतले त्यात केवळ ठाकरे आणि पवार साहेबांचा बोलबाला हे सर्वांनीच पाहिलेल आहे. दुसऱ्या बाजूने राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री आम्हाला न्याय देत नाहीत, आमच्या मंत्र्याला निधी कमी दिला जातो ? निर्णय प्रक्रियेत आम्हाला विचारलं जात ? अशा प्रकारची तक्रार अनेकदा काँग्रेस ज्येष्ठ मंत्र्यांनी केलेली.

त्याहून अधिक शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेस नेतृत्वाचा मागच्या दोन तीन वर्षात सतत अपमान. राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार यांनीही काँग्रेस पक्षावर आणि नेतृत्वावर अनेकदा प्रहार. पण राज्यातील काँग्रेसजन यांना केवळ सत्ता हवी असल्याने गुमान लाथाळ्या सहन करत ? प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आक्रमक चेहरा म्हणून वरतून पाठवले तरी नेहमीच त्यांची बोटचेपी भूमिका काँग्रेस पक्षाला घातक ठरत आहे. शिवसेना नेते संजय राऊत पुण्याच्या दौऱ्यावर होते तिथे महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. एक गोष्ट खरी आहे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशा लढवाव्यात आणि कशा जिंकायच्या यासाठी राज्यात सत्ताधारी असलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना वाले काँग्रेस पक्षाला विश्वासात न घेता प्रसंगी अडगळीत अंधारात ठेवून निवडणूक प्रक्रिया राबवत की ? असा संशय आता येऊ लागला. कारण संजय राऊत पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले राज्यात ठाकरे पवार पॅटर्नचा बोलबाला चालतो. हे त्यांचं वक्तव्य काँग्रेस पक्षासाठी चिंतनीय आणि आव्हानात्मक निश्चित आहे !

कारण संजय राऊत हे राज्यात आपण तीन पक्ष मिळून एकत्र सरकार चालवतो हे मान्य करायलाच तयार ? त्यामुळे अधून मधून सतत काँग्रेस नेतृत्वाचा त्यांच्याकडून अपमान केला . ठाकरे पवार पॅटर्न बोल बाला असं म्हणण्याचा नेमका अर्थ अगदी पाण्यातल्या लेकराला विचारलं तरी तो उठून . काँग्रेस पक्ष त्यांच्या लेखी नगण्य ? त्यांचं नेतृत्व मान्य, आणि जर असतं तर मग रावतांनी ठाकरे पवार गांधी पॅटर्न असा उल्लेख केला. दुसरीकडे अशी त्यांची भाषा म्हणजे काँग्रेस पक्षाचा आणि नेतृत्वाचा सरळ सरळ अपमान होय. वास्तविक यापूर्वी सुद्धा अनेकदा त्यांनी अपमान केले, एवढ्या डुसन्या मारून सुद्धा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटवले किंवा अशोकराव चव्हाण बाळासाहेब थोरात यांच्यासारखी मंडळी तोंडात डिंक ठेवून बघ्याची भूमिका घेते ? हेच खरं दुर्दैव सर्वसामान्य काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला.

जर ठाकरे पवार पॅटर्न बोलबाला असेल तर मग राहुल गांधी यांचं नेतृत्व महाराष्ट्रात शून्य आहे असंच संजय राऊत यांना म्हणायचं का? असाही अर्थ निघू शकतो. दुसरी गोष्ट नेहमी आपमान करत असताना काँग्रेस वेगळी भूमिका घेत नाही, कारण त्यांना सत्तेची गरज ही गोष्ट आता ठाकरे पवार पॅटर्नच्या लक्षात आली. त्यामुळे आज दिल्लीच्या नेतृत्वाचा अपमान यांनी केला उद्या महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा अपमान अशाप्रकारे होऊ शकतो? वास्तविक पाहता काँग्रेस पक्षासाठी आत्मपरिक्षण करायला लावणारी ही गोष्ट . पण सत्ता जेव्हा डोक्यात बसते तेव्हा नेतृत्व आणि पक्षाचा अपमान ? कुळाला कोणी उद्धार केला तरी गुमान सहन करावा लागतो . कारण मंत्रिपदाची खुर्ची वेड लावणारी असते, तसंच चित्र सध्या महाराष्ट्र काँग्रेसमध्ये दिसून . बाकी काही असलं तरीशिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचा बुक्क्याचा मार काँग्रेस पक्ष राज्यात सहन करत आहे तो नेमका ? हे येणार्‍या काळात दिसून . सध्यातरी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा , पण त्याला कधीही ब्रेक सत्तेची लाचारी पकडलेली नेते लावू शकतात हे मात्र नक्की .

राम कुलकर्णी

हे ही पहा: