“आपल्या ताई मोठ्या हुशार निघाल्या, त्यांनी मोदींना राखी बांधली आणि…”, ठाकरेंचा भावना गवळींवर गंभीर आरोप

बुलडाणा – सत्तांतरानंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांनी बुलडाण्यात सभा घेतली. उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गट होते . यावेळी  उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटातील आमदार आणि खासदारांचा खरपूस समाचार घेतला.

ते म्हणाले,  अनेक महिन्यांनंतर वर्षांनंतर आपल्या दर्शनाला आलो आहे. दसरा मेळाव्यानंतरच आई जिजाऊंच्या जन्मस्थानी आशीर्वाद घेऊन सुरुवात करायची, म्हणून बुलढाण्यात आलो. आज शहीद दिन, संविधान दिन. परंतु ते संविधान आज सुरक्षीत आहे का?  काही दिवस अगोदर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत होतो. आज देशाची लोकशाही वाचवायची ही सगळ्यांची भावना. तेच बोलले आमचे रेडे. आज नवस फेडायला गेले परवा हात दाखवायला गेले होते. तुमच भविष्य तुम्हाला माहिती नाही आणि हे राज्य चालवणार. दिल्लीने म्हटले की उठायचे बस म्हटले की बसायचे.

काही जुने चेहरे दिसत नाहीत. नितिन देशमुख चांगला शिवसैनिक. ते परत आले.  आज सगळे काय झाडी काय डोंगर सगळे ओक्के. ते तिकडे आशीर्वाद घ्यायला गेले, मी जिजाऊंचे आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय. काही गेलेत, नितिन आहे, विनायक राऊत आहेत, अरविंद सावंत आहेत. मी पुन्हा त्वेषाने उभा आहे.

कसे नेले इथल्या ताई मोठ्या हुशार थेट पंतप्रधानांना राखी बांधली आणि फोटो छापून आणला. ही चालूगिरी लोक बघत नाहीएत. भाजप आज आयात पक्ष, भाकड पक्ष. यादी काढा मग समजेल किती आयात लोक. स्वतः चंद्रकांत पाटील बोलले. मनावर दगड ठेवला. आजही गद्दारांनी सांगावे आम्ही भाजपाच्या टिकिटावर लढणार नाही. बाळासाहेब हवेत, चिन्ह हवे मग तुमची मेहनत कुठे आहे?असा सवाल देखील त्यांनी केला.

आपल्या पलिकडच्या ताईंना धमक्या देण्यात आल्या, त्यांच्या चेलेचपाट्यांना अटक करण्यात आली आणि मग मोठ्या हुशार ताईंनी थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली,” असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील खासदार भावना गवळी यांच्यावर केला. तसेच मोदींना राखी बांधल्यानंतर गवळींवरील ईडी-सीबीआय कारवाई थांबली, असंही नमूद केलं.